खांदेश्वर पोलीसांनी केली विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांची आर.टी.पी.सी.आर टेस्ट..

पनवेल दि.16 (संजय कदम)- खांदेश्वर पोलीस ठाणे हद्दीमध्ये लॉकडाऊनमुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने नागरिकांच्या मनातील भीती कमी झालेली आहे. त्यामुळे नागरिकांचे  विनाकारण इतरत्र वावरणे सुरू झालेली आहे. पोलीस दल व मनपा प्रशासन नियमित नागरिकांना सुचना देवून बाहेर न पडण्याचे नागरिकांना नियमित आव्हान करत असून यासाठी हद्दीत तीन ठीकाणी नियमित नाकाबंदी करत असून मॉर्निग वॉक इ्व्हीनिंग वॉक करणाऱ्या इसमांवर नियमित कारवाया करत आहेत तरीही विनाकारण बाहेर फिरणा- यांची संख्या कमी होत नसल्याने आता वरिष्ठ पोलिस निरीक्षक देविदास सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने या नागरिकांची आरटिपिसिआर टेस्ट सुरू केल्याने नागरिकांची पळापळ होत आहे.               कोरोनाचे संक्रमण वाढण्याची शक्यता असल्याने पोलिस उपआयुक्त, परी-२, पनवेलचे शिवराज पाटील व सहा. पोलिस आयुक्त, पनवेल विभाग नितीन भोसले-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्रे क्र-३, नवीन पनवेल च्या  वैद्यकीय अधिकारी श्रीमती विजया लोहारे यांच्याशी समन्वय साधून  संयुक्त कारवाईमध्ये खांदेश्वर पोलीस ठाणे हद्दीमध्ये आदई सर्कल येथे विनाकारण फिरणाऱ्या ७० लोकांची आरटिपिसिआर टेस्ट करण्यात आलेली आहे.  सदर कारवाई मध्ये वैदकीय पथकाचे पाच कर्मचारि व पोलीस दलाचे तीन अधिकारी व दहा कर्मचा -यांनी सहभाग घेतला होता. अशाच प्रकारे पनवेल शहर पोलिस ठाणे व खारघर पोलिस ठाण्यांतर्गत त्यांच्या परिसरातसुद्धा अशा प्रकारची कारवाई सुरू करण्यात आली आहे.
कोट-सदर मोहिम यापुढेही राबविण्यात येणार .आहे विना कारण कोणीही घराबाहेर पडू नये व प्रशासनास नागरिकांनी सहकार्य करावे   
-वपोनि देविदास सोनवणे           फोटोः खांदेश्वर पोलिस ठाण्यातर्फे नागरिकांची आरटीपिसीआर टेस्ट करताना
Comments
Popular posts
नवनियुक्त कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले यांचे पनवेल मध्ये जंगी स्वागत...
Image
दिव्यांग क्रांती संघटना व दिव्यांग उत्कर्ष सामाजिक संस्था तर्फे दिव्यांग दिन सोहळा संपन्न...
Image
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ग्राहक संरक्षण कक्षातर्फे राबविण्यात आले ग्राहक जागृती अभियान...
Image
विना परवानगी आठवडा बाजार व अनधिकृत हातगाडयांवर कारवाई करा - आमदार प्रशांत ठाकूर यांची महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी
Image
महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या आणि लाखो निसर्गप्रेमींनी भेट दिलेल्या ; 'रामबाग' उद्यानाचा वर्धापनदिन सोहळा उत्साहात साजरा
Image