औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून ऑक्सिजनसह इतर वस्तूंची चोरी
पनवेल, दि. २१ (संजय कदम) ः पनवेल शहरात असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) हे बंद असल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी केलेल्या घरफोडीत ऑक्सिजन रेग्युलेटरसह इतर वस्तूंची चोरी झाल्याची घटना घडली आहे.
सदर औद्योगिक प्रशिक्षण संस्था ही गेल्या एक महिन्यापासून बंद होती. येथील शिक्षक संतोष जामोदकर यांनी ही संस्था उघडून ते वर्कशॉपमध्ये गेले असता तेथे त्यांना रेग्युलेटर ऑक्सिजन, रेग्युलेटर असिटीलीन, गॅस वेल्डींग ब्लो पाईप, हाफ राऊंड फाईल, वेल्डींग केबल 40 मीटर असा मिळून 17500 रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने याबाबतची तक्रार त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.