मतदार यादीत नाव नोंदणी करण्याचे तहसीलदार विजय तळेकर यांचे नागरिकांना आवाहन.....

तहसिल कार्यालय किंवा मतदार नोंदणी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.....

पनवेल : (प्रतिनिधी) भारत निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०२१ या अर्हता दिनांकावर आधारीत राज्यातील सर्व विधानसभा मतरसंघाच्या छायाचित्र मतदार यादीचा संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम जाहिर केला आहे. या कार्यक्रमांतर्गत १०० टक्के शुध्द मतदार यादी तयार करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मतदारांनी मतदार यादी शुध्द करण्यासाठी नाव नोंदणी, दुरुस्ती दुबार नाव वगळणी करुन घेण्यासाठी संबंधीत मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (बी.ए.ल ओ.) तहसिल कार्यालय किंवा मतदार नोंदणी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
         १८८ पनवेल विधानसभा मतदारसंघात एकूण ५७० मतदार यादीभाग आहेत. त्यापैकी २५७ यादीभागातील ४४ हजार ११२ मतदारांचे फोटो मतदार यादीत नसल्याचे आढळून आले आहे. तसेच १९० उरण विधानसभा मतदारसंघातील तालुका पनवेल अंतर्गत १२४ यादी भाग असुन त्यामध्ये २ हजार २२ मतदारांचे फोटो मतदार यादीत नसल्याचे आढळून आले आहे. ज्या मतदारांचे रंगीत छायाचित्र मतदार यादीत नाही. अशा मतदारांनी आपले रंगीत फोटो ३० जुन पर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी / तलाठी किंवा निवडणुक शाखा तहसिलदार कार्यालय, पनवेल कार्यालयात जमा केले नाहीत तर मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात येतील
        १६ जानेवारी २०२१ रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या मतदार यादीमध्ये नागरिकांनी त्यांच्या मतदारसंघाच्या मतदार यादीत त्यांच्या नावासमोर फोटो आहे किंवा नाही याची खात्री करुन घ्यावी. मतदार यादीत फोटो नसल्यास तात्काळ आपला अद्यावत कलर (रंगीत ) पासपोर्ट साईज फोटो संबंधित बीएलओ, तलाठी किंवा निवडणुक शाखा तहसिल कार्यालय पनवेल, कार्यालयात जमा करावेत अन्यथा अशा मतदारांची नावे मतदार यादीतुन वगळण्यात येणार आहेत. नागरिकांनी मतदार यादी मध्ये नाव नोंदणी, दुरुस्ती अथवा वगळणी बाबत त्यांचे यादीभागीशी संबंधित बि.एल.ओ., तलाठी किंवा निवडणुक शाखा तहसिलदार कार्यालय पनवेल या कार्यालयाशी अथवा raigad.nic.in या संकेतस्थळास कृपया भेट देण्याचे आवाहन विजय तळेकर सह. मतदार नोंदणी अधिकारी (१८८ पनवेल/१९० उरण विधानसभा मतदार संघ) तथा तहसिलदार पनवेल यांनी केले आहे.
Comments
Popular posts
नवनियुक्त कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले यांचे पनवेल मध्ये जंगी स्वागत...
Image
दिव्यांग क्रांती संघटना व दिव्यांग उत्कर्ष सामाजिक संस्था तर्फे दिव्यांग दिन सोहळा संपन्न...
Image
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ग्राहक संरक्षण कक्षातर्फे राबविण्यात आले ग्राहक जागृती अभियान...
Image
विना परवानगी आठवडा बाजार व अनधिकृत हातगाडयांवर कारवाई करा - आमदार प्रशांत ठाकूर यांची महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी
Image
महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या आणि लाखो निसर्गप्रेमींनी भेट दिलेल्या ; 'रामबाग' उद्यानाचा वर्धापनदिन सोहळा उत्साहात साजरा
Image