स्व.पत्रकार वचन गायकवाड यांना पनवेलमधील पत्रकारांनी वाहिली श्रद्धांजली .....

पनवेल :  पत्रकारिता क्षेत्रात काम करीत असताना शासनाच्या सुविधांपासून अनेक पत्रकारांना वंचित राहावे लागत आहे, त्यातच पत्रकारितेच्या वेडामध्ये काम करीत असताना स्वतःचा जीव धोक्यात घालून नवनवीन बातम्या शोधून वाचकांसमोर त्या बातमीचा जिवंतपणा द्यावा लागतो. सध्या कोरोनाचा प्रसार वाढल्याने पत्रकारांच्या जीवावर तो बेतत आहे. पनवेल तालुक्यातील एक जागृत पत्रकार वचन गायकवाड यांनाही कोरोनाने आपल्या विळख्यात घेतलं, आणि पनवेलच्या पत्रकारांमधून अचानक एक्झिट घेतली. 

वचन गायकवाड यांच्या जाण्याने पनवेल तालुक्यातील पत्रकार एकवटले आणि त्यांनी वचन गायकवाड यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी तालुक्यातील सर्व पत्रकारांनी एकत्र येऊन वचन गायकवाड यांच्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी मदत करण्याचा निर्धार केला. एक सच्चा दोस्त सहकारी गमावल्याचे दुःख यावेळी जेष्ठ पत्रकारांनी व्यक्त केले. वचन गायकवाड यांच्या अचानक जाण्याने पनवेल तालुक्यातील राजकीय, सामाजिक क्षेत्रासह तळोजा परिसरातील औद्योगिक क्षेत्रातूनही दुःख व्यक्त करण्यात आले आहे. वचन गायकवाड यांच्या कुटुंबाच्या दुःखात पनवेलमधील सर्व पत्रकार सहभागी असून सामाजिक बांधिलकी जपण्याच्या दृष्टीने वचन गायकवाड यांच्या कुटुंबासाठी पत्रकार एकवटले आहेत. यावेळी अधिकाधिक मदत त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचविण्याचा निश्चय उपस्थित सर्व पत्रकारांनी केला. 

यावेळी शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या शोकसभेला जेष्ठ पत्रकार माधवराव पाटील, जेष्ठ पत्रकार विजय कडू, जेष्ठ पत्रकार सुनील पोतदार यांच्यासह पत्रकार रमेश भोळे, गणेश कोळी, मंदार दोंदे, विवेक पाटील, रत्नाकर पाटील, निलेश सोनावणे, सय्यद अकबर, संजय कदम, अनिल भोळे, दीपक महाडिक, अरविंद पोतदार, मयूर तांबडे, राज भंडारी, राकेश पितळे, के.सी.सिंग, लक्ष्मण ठाकूर, बाळू जुमलेदार, सुमंत नलावडे, अविनाश जगधने, नितीन देशमुख, राजेश डांगळे,  संतोष भगत, विशाल मनोहर सावंत, विशाल रावसाहेब सावंत, विजय पवार, साहिल रेळेकर, दीपक घोसाळकर, दत्ता मोकल, अनिल कुरघोडे, सुभाष वाघपंजे, सुधीर पाटील, भरतकुमार कांबळे, नंदकिशोर धोत्रे, मल्हारी पाटील आदींसह पत्रकार बांधव उपस्थित होते.
Comments