घरातील दागिने केले लंपास
पनवेल दि.07 (वार्ताहर)- बंद घराच्या दरवाजाची कडी उघडून अज्ञात चोरट्यांनी ब्लाऊजमधील पर्समध्ये ठेवलेले रोख रकमेसह दागिने लबाडीने चोरून नेल्याची घटना पनवेल शहरात घडली आहे.
फातिमा शेख (रा.-इस्माईल पटेल चाळ) यांच्या बंद घराच्यादरवाजाची कडी उघडून अज्ञात चोरट्यांनी घरातील 27 हजार रूपये रोख व इतर सोन्याचे दागिने असा मिळून जवळपास 67 हजारांचा ऐवज चोरल्याची तक्रार पनवेल शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.