पनवेल,(प्रतिनिधी) -- राज्यात पुन्हा रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असताना श्री स्वामी सिधवासा अपार्टमेंटच्या वतीने रविवार ता. 20 रोजी सकाळी रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या शिबिराचे उद्घाटन हेमंत म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्यांनी रक्तदानाचे महत्त्व सागितले. रक्तदान म्हणजे जीवनदान एक रक्तदाता कित्येक जणांचे प्राण वाचवू शकतो म्हणून रक्त दान हे सर्वश्रेष्ठ दान आहे.
या वेळी स्वामी सिधवासा अपार्ट मेंट मधील अध्यक्ष जयंत पाखरे यांच्या नियोजनातून सेक्रेटरी, मोहन पाटील, खजिनदार हेमंत म्हात्रे तसेच सदस्य विजय वाघमारे, अनंत मांडवकर, रामचंद्र मांडवकर यांचा सक्रिय भाग होता. यावेळी देवद गावातील विजय वाघमारे, मोहन पाटील, अनंत मांडवकर यांचे नातेवाईक मित्र मंडळी तरुणानी खूप उत्साहाने रक्तदान केले. रक्त दात्याना प्रमाण पत्र व तुळशीचे रोप देऊन त्यांचा सत्कार केला. शेवटी एम जी.एम. हॉस्पिटल येथून आलेल्या सर्व कर्मचाऱ्याचे तुळशी रोप देऊन अध्यक्ष जयंत पाखरे यांच्या कडून आभार मानण्यात आले.