घरफोडीत रोख रकमेसह दागिने लंपास
पनवेल, दि.14 (संजय कदम) ः एका बंद घरात अज्ञात चोरट्याने बाल्कनीच्या दरवाजाद्वारे आत प्रवेश करून बेडरुममधील लोखंडी कपाटाच्या दरवाजाचे लॉक तोडून आतील रोख रकमेसह दागिने असा मिळून जवळपास 1 लाख 40 हजाराचा ऐवज चोरुन नेल्याची घटना तालुक्यातील इंडिया बुल्स ग्रीन सेक्टर 3 कोनगाव येथे घडली आहे.
या ठिकाणी राहणारे सजनलाल पृथ्वीराज मिना (33) यांचे बंद असल्याचे पाहून अज्ञात इसमाने त्यांच्या बंद घराच्या बाल्कनीच्या दरवाजाच्यावाटे घरामध्ये प्रवेश करून घरातील बेडरुममध्ये असलेल्या लोेखंडी कपाटाचे लॉक तोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम 50 हजार असा मिळून जवळपास 1 लाख 40 हजाराचा ऐवज चोरुन नेल्याची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.