पारगाव ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त ग्रामस्थांचे लसीकरण.....
पनवेल दि.२८ (वार्ताहर): छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त ग्रामस्थांसाठी कोव्हिशिल्डचे लसीकरण हा अनोखा उपक्रम सरपंच सौ. अहिल्या बाळाराम नाईक यांनी राबविला होता. त्याला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.          

शासनाकडून 50 लसीकरणाचे डोस, ग्रुप ग्रामपंचायत पारगाव यांना देण्यात आले होते. यावेळी रा.जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी उपयुक्त सूचना करताना त्यांनी सांगितले की, ग्रामस्थांनी सोशल डिस्टंसिंग पाळावे, विनाकारण घराबाहेर पडू नये, शासन वेळोवेळी आवश्यक त्या सूचना व मार्गदर्शन करते त्याचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन त्यांनी केले. 
यानिमित्ताने डॉ. पाटील, डॉ. जोशी, डॉ. चौधरी, परिचारिका सुशिल जोग तसेच गव्हाण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. अस्मिता पाटील, मलेरिया वर्कर्स म्हात्रे, कदम यांचे लसीकरणासाठी मोलाचे योगदान लाभले. या कार्यक्रमासाठी सरपंच सौ. अहिल्या बाळाराम नाईक, उपसरपंच सौ. अंजली कांबळे, मा. उपसरपंच मनोज दळवी, मा. उपसरपंच सुशिलकांत तारेकर, सदस्या निशा पाटील, बाबूबाई म्हात्रे, सुनंदा नाईक, सोनाली भोईटे, कल्पना तारेकर, विश्वनाथ पाटील, विजय वाघे, शिल्पा नाईक, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब नाईक, सदाशिव पाटील, रत्नाकर पाटील राहूल कांबळे, ग्रामपंचायत कर्मचारी प्रमोद म्हात्रे, चंद्रभागा तारेकर, संतोष देवळे, सानिका देशमुख, ग्रामविकास अधिकारी मोरेश्वर मोकल आदी उपस्थित होते. 
यावेळी बोलताना सरपंच सौ. अहिल्या बाळाराम नाईक यांनी सांगितले की, आज डोस कमी पडले असले तरी शासनाकडून पुढील लस लवकरात लवकर मिळण्यासाठी मागणी करणार आहे. ग्रामस्थांनी विनाकारण बाहेर फिरू नये, तसेच मास्कचा वापर करावा असे आवाहन त्यांनी केले.            


फोटोःग्रुप ग्रामपंचायत पारगाव येथे राबविण्यात आलेली लसीकरण मोहिम यावेळी उपस्थित मान्यवर
Comments