मोहोटा देवी मंदिर परिसरात निसर्गप्रेमी महिलांनी केले वृक्षारोपण.....
पनवेल/प्रतिनिधी:- सध्या कोरोनाच संकट सर्व जगावर आलं आहे त्यावर सामना करत नागरिक कोरोनावर मात करत आपल्या उदरनिर्वाह करत जनजीवन सुरु असून सध्या निसर्गाशी मानव जात खेळत आहे प्रदूषण वाढत चालय त्यात झाडे तोडून टाकली जातात झाडापासून प्रदूषण कमी होऊन ऑक्सिजन वातावरणात येत असतो याची जाणीव लक्षात घेऊन पनवेल येथील महिला रिक्षा चालकांनी एकत्र येत झाडे लावण्याचा संकल्प केला रिक्षा व्यवसाय करत त्यातून महिलांनी थोडे थोडे पैसे जमा केले त्यातून झाडे खरेदी करून नवीन पनवेल येथील सेक्टर 5 मधील मोहोटा देवी (रेणुका माता )मंदिरा आवारात आयुर्वेदिक तसेच अनेक प्रकारची झाडे लावले तसेच निसर्ग टिकवण्या साठी आम्ही महिला जनजागृती करून नागरिकांना माहिती देऊ असे या वेळी महिलांनी सांगितले या वेळी सौ.ललीता राऊत , सौ.आशा घालमे, सौ.आश्विनी शितोळे, सौ.मनिषा देशमुख, सौ.वर्षा धरने , सौ.आणिता पाटील, सौ.जयश्री देशमुख, सौ.कमल घोलप, सौ.आणिता डावरे,सौ.सीमा नरोडो आदी उपस्थित होते.
Comments