झाडांच्या छाटलेल्या फांद्या वेळीच न उचलल्यास सिडको कार्यालयाच्या आवारात या फांद्या टाकून शेकाप तीव्र आंदोलन छेडणार....
पनवेल, दि.13 (वार्ताहर)-गेल्या १० दिवसापासून खांदा कॉलनी आणि परिसरात झाडांच्या छाटलेल्या फांद्या पडून आहेत.याचा मोठा त्रास खांदा कॉलोनी मधील रहिवासी, वाहनचालक यांना होत आहे. येत्या दोन दिवसात या फांद्या नाही उचलल्या तर शेकापचे कार्यकर्ते सिडको कार्यालयाच्या आवारात या फांद्या टाकून तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा शेकाप पनवेल महानगरपालिका जिल्हा कार्याध्यक्ष महादेव वाघमारे यांनी सिडकोला दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.           या निवेदनाला यांनी म्हटले आहे की, खांदा वसाहत परिसरात सिडकोकडून झाडांच्या फांद्या गेल्या 10 दिवसांपूर्वी छाटण्यात आल्या आहेत. परंतु फुथपाथ व रस्त्यावर पडलेल्या या फांद्या अद्याप उचलल्या गेल्या नाही आहेत. त्यामुळे नागरिकांना ये-जा करताना फुथपाथवरून त्रास होत आहे. तसेच रस्त्यावर पडलेल्या फांद्यांवर वाहनचालकांनासुद्धा वाहन चालविताना अडचण होत आहे. या संदर्भात सिडको कार्यालयात कळवूनहीरस्त्यावर पडलेल्या या फांद्या अद्याप उचलल्या गेल्या नाही आहेत.येत्या दोन दिवसात या फांद्या नाही उचलल्या तर शेकापचे कार्यकर्ते सिडको कार्यालयाच्या आवारात या फांद्या टाकून तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा शेकाप पनवेल महानगरपालिका जिल्हा कार्याध्यक्ष महादेव वाघमारे यांनी सिडकोला दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.           फोटोःरस्त्यावर पडलेल्या फांद्या
Comments
Popular posts
नवनियुक्त कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले यांचे पनवेल मध्ये जंगी स्वागत...
Image
दिव्यांग क्रांती संघटना व दिव्यांग उत्कर्ष सामाजिक संस्था तर्फे दिव्यांग दिन सोहळा संपन्न...
Image
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ग्राहक संरक्षण कक्षातर्फे राबविण्यात आले ग्राहक जागृती अभियान...
Image
विना परवानगी आठवडा बाजार व अनधिकृत हातगाडयांवर कारवाई करा - आमदार प्रशांत ठाकूर यांची महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी
Image
महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या आणि लाखो निसर्गप्रेमींनी भेट दिलेल्या ; 'रामबाग' उद्यानाचा वर्धापनदिन सोहळा उत्साहात साजरा
Image