ज्योती देशमाने यांची मुंबई सेन्सॉर बोर्डवर नियुक्ती...
पनवेल, दि.१० (वार्ताहर) ः वैद्यकीय सेलच्या संयोजिका सौ.ज्योती देशमाने यांची मुंबई सेन्सॉर बोर्डवर नियुक्ती करण्यात आल्याबद्दल स्थानिक नगरसेवक राजू सोनी यांनी त्यांना पुष्पगुच्छ देवून त्यांचे अभिनंदन केले आहे.
केंद्रीय फिल्म प्रमाणपत्र बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र भाकर यांनी तशा आशयाचे नियुक्तीपत्र ज्योती देशमाने यांना दिले आहे. या त्यांच्या नियुक्तीबद्दल पनवेल परिसरातील नागरिकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
Comments