लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त कलाकारांना अभिनेत्री नयन पवार यांच्या पुढाकाराने धान्य वाटप

मुंबई, दि. ४ -  सध्या कोरोनामुळे चित्रपटगृह, नाट्यगृह बंद असल्याने बॅक स्टेज कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. हे लक्षात घेऊन अरविंदो मीरा संस्थेच्यावतीने दादर टी टी या ठिकाणी अभिनेत्री नयन पवार यांनी कलाकारांना धान्य वाटप केले. 

लॉक डाऊनमुळे सर्वसामान्य गरीब, मजूर, तसेच बॅक स्टेज कलाकारांची उपासमार होत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन नयन पवार यांनी वडाळा येथील पाच उद्यान या ठिकाणी अनेक कलाकारांना धान्याचे वाटप केले होते. त्यानंतर दादर मध्ये राहणाऱ्या कलाकारांनी ही मदत मागितली होती. त्यानुसार अरविंदो मीरा संस्था तसेच लोकनेते मा. खासदार रामशेठ ठाकूर, यांच्यावतीने बॅक स्टेज कलाकारांना अभिनेत्री नयन पवार यांनी धान्याचे वाटप केले. दादर टी टी या ठिकाणी हा वाटपाचा कार्यक्रम झाला.    
                  यावेळी अरविंदो मीरा संस्थेच्या सचिव मानसी राऊत, समाजसेवक रत्नाकर खानविलकर, यांची विशेष उपस्थिती होती.
Comments
Popular posts
नवनियुक्त कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले यांचे पनवेल मध्ये जंगी स्वागत...
Image
दिव्यांग क्रांती संघटना व दिव्यांग उत्कर्ष सामाजिक संस्था तर्फे दिव्यांग दिन सोहळा संपन्न...
Image
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ग्राहक संरक्षण कक्षातर्फे राबविण्यात आले ग्राहक जागृती अभियान...
Image
विना परवानगी आठवडा बाजार व अनधिकृत हातगाडयांवर कारवाई करा - आमदार प्रशांत ठाकूर यांची महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी
Image
महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या आणि लाखो निसर्गप्रेमींनी भेट दिलेल्या ; 'रामबाग' उद्यानाचा वर्धापनदिन सोहळा उत्साहात साजरा
Image