पनवेल, दि.१६ (वार्ताहर) ः आपण अनेकदा मोबाईलचे एखादे नवीन मॉडेल बाजारात आले की ते विकत घेतो. अशावेळी आपण जुन्या मोबाईलचे काय करतो? जर आपल्यापैकी कोणाकडे असे जुने पण चांगल्या अवस्थेतले मोबाईल फोन असतील तर तुम्ही ते दान देऊ इच्छिता का? नंदकुमार मारुती जाधव फाऊंडेशन नवीन पनवेल तर्फे चालवण्यात येणार्या विशेष मुलांच्या शाळेतल्या काही मुलांना केवळ मोबाईल घेण्याची ऐपत नसल्याने शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे. त्यांना मोबाईल देण्यात येणार आहेत.
यासाठी त्यांनी आवाहन केले आहे की, तुमच्याकडे वापरत असलेला जुना मोबाईल फोन फेकून न देता तो या संस्थेला द्यावा. तसेच त्या मोबाईलचा चार्जरही द्यावा. यासाठी 1)नंदकुमार मारुती जाधव फाऊंडेशन ट्रस्ट संचलित अक्षम बौद्धिक मुलांची शाळा, प्लॉट नंबर 137, सेक्टर 1/एस. शबरी हॉटेलजवळ, नवीन पनवेल सोमवार ते शुक्रवार सकाळी 11 ते दुपारी 3 किंवा डॉ. समिधा ययाती गांधी 1/2, बी, केशव वसंत, जुन्या तहसीलदार आॉफिससमोर, वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाजवळ, पनवेल येथे सकाळी दहा ते बारा आणि सायंकाळी पाच ते सात सोमवार ते शुक्रवार संपर्क साधावा. भ्रमणध्वनी 02227457203, 9820138605.