रोटरी क्लब ऑफ पनवेल मिडटाउन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे भाताण शाळेस भरघोस मदत.....

पनवेल दि.28 (वार्ताहर): रोटरी क्लब ऑफ पनवेल मिडटाउन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे तालुक्यातील राजिप भाताण शाळेस ई लर्निंगसह प्रोजेक्टर, चार वर्गांची ट्यूबलाईट व फॅनसह संपूर्ण लाईट फिटींग, कपाट, टेबल, ऑफिस, व्हिलचेअर, लोखंडी दरवाजा, लेझीम, ताशा, गोष्टींची पुस्तके, खेळाचे साहित्या इ . वस्तूंची भरघोस मदत करून ग्रामिण भागातील रा.जि.प. भाताणा शाळा शैक्षणिक व भौतिक सुविधांनी सुसज्ज केली.         
शाळेतील मुलांच्या लेझीम - ढोल - ताशा पथकाने पाहुण्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. रश्मी कुलकर्णी रोटरी 3131च्या जिल्हा गव्हर्नर व संजिवनी मालवणकर जिल्हा व क्लब हॅपी स्कूल प्रोजेक्ट चेअरपर्सन यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाची फित कापून उद्घाटन करण्यात आले. 
सदर कार्यक्रमास रोटरी क्लब ऑफ पनवेल मिडटाऊनचे प्रेसिडंट संजय झेमसे, प्रसाद देशमुख क्लब ट्रेजरर, प्रशांत माने युथ डायरेक्टर, विक्रम धुमाळ आयपीपी, एन. सविता झेमसे, एन. शिल्पा चंदने, तसेच वसंत काठावले, उपसभापती पं.स. पनवेल सुभाष भोईर सरपंच, विनायक ठाकुर अध्यक्ष एसएमसी, जुमारे ताई, अनिल काठावले, ग्रा.स. देवरूखकर मुख्यध्यापिका, गजानन मालकर, मिरजकर, म्हात्रे इ. उपस्थित होते.  
वसंत काठावले यांनी आपल्या भाषणात संजिवनी मालवणकर यांच्या अथक प्रयत्नामुळेच शाळेस या शैक्षणिक व भौतिक सुविधांची मदत मिळाली. त्यांची शाळा व विद्यार्थ्याप्रती असलेली तळमळ खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. तसेच शाळेतील मालकर सर यांनी सुद्धा सदर साहित्य मिळविण्यासाठी खूप मेहनत घेतली असे मत व्यक्त केले. रोटरी क्लबतर्फे सर्व उपस्थितांनी तुळशीचे रोप व विद्यार्थ्यांना खाऊ देण्यात आला. शेवटी मिरजकर यांनी सर्वांचे आभार मानले. 
          

फोटोः रोटरी क्लब ऑफ पनवेल मिडटाउन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे शाळेला मदत करताना
Comments
Popular posts
नवनियुक्त कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले यांचे पनवेल मध्ये जंगी स्वागत...
Image
दिव्यांग क्रांती संघटना व दिव्यांग उत्कर्ष सामाजिक संस्था तर्फे दिव्यांग दिन सोहळा संपन्न...
Image
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ग्राहक संरक्षण कक्षातर्फे राबविण्यात आले ग्राहक जागृती अभियान...
Image
विना परवानगी आठवडा बाजार व अनधिकृत हातगाडयांवर कारवाई करा - आमदार प्रशांत ठाकूर यांची महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी
Image
महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या आणि लाखो निसर्गप्रेमींनी भेट दिलेल्या ; 'रामबाग' उद्यानाचा वर्धापनदिन सोहळा उत्साहात साजरा
Image