लायन्स रिजन ७ तर्फे बँक कर्मचार्‍यांचा सन्मान.....
लायन्स रिजन ७ तर्फे बँक कर्मचार्‍यांचा सन्मान

पनवेल, दि.१९ (संजय कदम) ः लायन्स रिजन ७ तर्फे पनवेल व परिसरातील विविध बँकेतील कर्मचार्‍यांचा एका शानदार समारंभात कोव्हीड योद्धे म्हणून स्मृतीचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देवून सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी रिजन चेअरमन ला.संजय गोडसे, मुख्य अतिथी म्हणून ला.एस.के.शर्मा, तसेच विशेष अतिथी म्हणून ला.राजेंद्र महानुभाव हे उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना ला.संजय गोडसे यांनी हा कार्यक्रम आयोजित करण्याचा उद्देश सांगितले. ते म्हणाले की, गेले दिड वर्ष या कठीण काळात बँक कर्मचारी आपल्या ग्राहकांना अविरत सेवा देत आहेत. ग्राहकांशी प्रत्यक्ष संपर्क येत असल्यामुळे ते मोठा धोका पत्करुन हे कार्य करीत आहेत. परंतु त्यांचा उल्लेख कुठेही केला गेला नाही. बँक कर्मचारी सुद्धा खरोखरच कोव्हीड योद्धे आहेत म्हणूनच त्यांना सलाम करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तर प्रमुख म्हणून ला.ए.के.शर्मा यांनी रिजन 7 तर्फे आयोजित केलेल्या विविध उपक्रमाचे कौतुक केले. त्याचप्रमाणे त्यांनी सांगितले की, बँक कर्मचारी खरोखरच कोणतीही पर्वा न करता अखंड ग्राहक सेवा देत आहेत आणि ते खरोखरच सत्कारास पात्र आहेत. ला.राजेंद्र महानुभाव यांनी सुद्धा बँकर्स करत असलेल्या कामांचे कौतुक करून रिजन चेअरमन ला.संजय गोडसे यांनी आयोजित केलेल्या या सत्कार सोहळ्याबद्दल अभिनंदन केले. सत्कारमुर्तींच्या वतीने सौ.रेखा सोनावणे व रवींद्र खोपटकर यांनी सांगितले की, अजून पर्यंत कोणीही बँक कर्मचार्‍यांचा कोव्हीड काळात केलेल्या कार्याबद्दल उल्लेख सुद्धा केला नाही. परंतु लायन्स क्लबने आमचा सन्मान केला ही खरोखरच खुप मोठी गोष्ट आहे. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ला.स्वाती गोडसे यांनी केले तर रिजन सचिव ला.सुयोग पेंडसे यांनी आभार मानले.
फोटो ः लायन्स क्लबतर्फे करण्यात आलेला बँक कर्मचार्‍यांचा सन्मान.
Comments
Popular posts
नवनियुक्त कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले यांचे पनवेल मध्ये जंगी स्वागत...
Image
दिव्यांग क्रांती संघटना व दिव्यांग उत्कर्ष सामाजिक संस्था तर्फे दिव्यांग दिन सोहळा संपन्न...
Image
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ग्राहक संरक्षण कक्षातर्फे राबविण्यात आले ग्राहक जागृती अभियान...
Image
विना परवानगी आठवडा बाजार व अनधिकृत हातगाडयांवर कारवाई करा - आमदार प्रशांत ठाकूर यांची महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी
Image
महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या आणि लाखो निसर्गप्रेमींनी भेट दिलेल्या ; 'रामबाग' उद्यानाचा वर्धापनदिन सोहळा उत्साहात साजरा
Image