पनवेल तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष अभिजित पांडुरंग पाटील यांची मध्य रेल्वेच्या सल्लागारपदी नियुक्ती....
पनवेल :-   रेल्वे प्रवासी, रेल्वे मालवाहतूक आणि अन्य रेल्वे सुविधांचा वापर करणाऱ्या लोकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी भारत सरकारच्या मध्य रेल्वेने स्थापन केलेल्या सल्लागार समितीवर अभिजित पां पाटील यांची नियुक्ती झाली आहे. नव्या गाड्या, नवे मार्ग आणि अन्य धोरणात्मक सुधारणा करण्यासाठी या समितीची मतं रेल्वे प्रशासनास विचारात घ्यावी लागतात. मा. महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे यांच्याकडून तशा आशयाचे पत्र आज त्यांना प्राप्त झाले आहे. सदर नियुक्ती ही दोन वर्षांच्या कालावधीसाठी आहे.
नियुक्ती जाहीर होताच राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, इंटक राष्ट्रीय सचिव महेंद्र घरत, पनवेल शहर जिल्हाध्यक्ष आर सी घरत, कार्याध्यक्ष सुदाम पाटील शिवसेना जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील तसेच महाविकास आघाडीतील प्रमुख नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे फोनवरून अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. अभिजित पां पाटील हे काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख असून त्यांनी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विविध पदांवर सक्रिय काम केले आहे तसेच अनेक सामाजिक संघटनांवर ते पदाधिकारी आहेत.
यावेळी त्यांनी सांगितले की सामान्य कुटुंबातून येऊन माझ्या सामाजिक कार्याची दखल घेत रेल्वे मंत्रालयाने मला माझ्या कामाची पोचपावती दिली आहे, येत्या काळात मध्य रेल्वेचे प्रवासी व प्रवासी संघटनांना विचारात घेऊन त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्याचा मी प्रयत्न करेन.
Comments
Popular posts
नवनियुक्त कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले यांचे पनवेल मध्ये जंगी स्वागत...
Image
दिव्यांग क्रांती संघटना व दिव्यांग उत्कर्ष सामाजिक संस्था तर्फे दिव्यांग दिन सोहळा संपन्न...
Image
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ग्राहक संरक्षण कक्षातर्फे राबविण्यात आले ग्राहक जागृती अभियान...
Image
विना परवानगी आठवडा बाजार व अनधिकृत हातगाडयांवर कारवाई करा - आमदार प्रशांत ठाकूर यांची महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी
Image
महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या आणि लाखो निसर्गप्रेमींनी भेट दिलेल्या ; 'रामबाग' उद्यानाचा वर्धापनदिन सोहळा उत्साहात साजरा
Image