हॉटेलसह ब्यूटी पार्लर, किराणा व मेडिकल स्टोरमध्ये अज्ञात चोरट्यांनी केली चोरी....
पनवेल दि.11 (संजय कदम)- पनवेल तालुक्यातील तळोजा फेज-1 याठिकाणी असलेल्या हॉटेलसह ब्यूटी पार्लर, किराणा व मेडिकल स्टोर बंद असल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी केलेल्या चोरीत हजारोंचा ऐवज व रोखरक्कम लंपास केल्याची घटना घडली आहे.
तळोजा फेज-1, से-14, प्लॉट क्र.-100 याठिकाणी असलेले ज्युबिलीयन कुक हॉटेल, मिस ब्यूटी पार्लर, हरिओम किराणा स्टोर तसेच स्वाती मेडिकल या दुकानांचे शटरचे कुलूप तसेच बाजूची कडी कोयंडा कशाने तरी तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करून रोखरक्कम व इतर सामान असा मिळून जवळपास 16 हजार 400 रूपयांचा ऐवज चोरल्याची तक्रार तळोजा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.