सरकारी कर्तव्य बजाविणाऱ्या कर्मचाऱ्याविरूद्ध हुज्जत घालून त्याची कॉलर पकडणाऱ्याविरूद्ध गुन्हा दाखल.....


पनवेल दि.5 (वार्ताहर)- सरकारी कर्तव्य पार पाडताना शासकीय कामात अडथळा आणून शासकीय कर्तव्य पार पाडण्यापासून परावृत्त करून सदर पोलिस हवालदाराविरूद्ध हुज्जत घालून, कॉलर पकडून धक्काबुक्की करून कठड्यावर पाडून सरकारी गणवेशाची नेमप्लेट पिनसकट उखडून गणवेशाच्या शर्टाचे बटन तोडून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी पनवेल तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
        
पनवेल तालुका पोलिस ठाण्यात कार्यरत असणारे पोलिस हवालदार ठाकूर हे नेरे बीट चौकी येथे कर्तव्य बजावित असताना शांतिवन फाटा येथील नदी पात्राच्या गणपती विसर्जनाच्या घाटाच्या ठिकाणी लोकांची गर्दी होऊ नये म्हणून ते कार्यरत असताना आरोपी दुश्यंत अजय पाल (रा.-कोपरोली) याने सदर ठिकाणी हेऊन नदी पात्राच्या दिशेने जात असताना त्याला मज्जाव केला असता तसेच कोरोना आजाराचे प्रादूर्भावामुळे सध्या लॉकडाऊन असल्याने घरी जाण्यास सांगितले असता त्याचा राग मनात घेऊन त्याने सरकारी कर्तव्य पार पाडत असलेले ठाकूर यांच्याशासकीय कामात अडथळा आणून शासकीय कर्तव्य पार पाडण्यापासून परावृत्त करून सदर पोलिस हवालदाराविरूद्ध हुज्जत घालून, कॉलर पकडून धक्काबुक्की करून कठड्यावर पाडून सरकारी गणवेशाची नेमप्लेट पिनसकट उखडून गणवेशाच्या शर्टाचे बटण तोडून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी पनवेल तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
Comments