पनवेल शिवसेनेतर्फे महाड येथील पुरग्रस्तांसाठीची मदत तहसील कार्यालयात सुपूर्द..
पनवेल वैभव/ प्रतिनिधी :- महाड येथे आलेल्या पुरामुळे स्थानिकांचे संपूर्ण जीवनच कोलमडले आहे, निसर्गाची ही घटना मनाला चटका लावणारी घटना घडली असून तेथील पूरग्रस्त भागांसाठी मदत म्हणून शिवसेना पनवेलच्या वतीने पनवेल तहसील कार्यालय येथे ५०  पाण्याचे बॉक्स सुपूर्द करण्यात आले . यावेळी उपशहरप्रमुख राहुल गोगटे व ज्येष्ठ शिवसैनिक संजय लोंढे उपस्थित होते.
Comments