केएन फाऊंडेशन व संवेदना चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून चिपळूण,महाड येथील पुरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन...

पनवेल, दि.30 (वार्ताहर) ः गेल्या काही दिवसापासून पडलेल्या मुसळधार पावसामुळे कोकणातील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले असून अनेक गावात व घरात, वाड्यांत पाणी शिरल्याने तेथील रहिवाशांचे हाल झाले आहेत. अशांना मदत म्हणून सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्‍या पनवेलसह नवी मुंबई, मुंबई परिसरात नेहमीच मदत करणार्‍या केएन फाऊंडेशन व संवेदना चॅरिटेेबल ट्रस्टच्या संस्थापिक अध्यक्षा कोमल खोचरे (तावरे) यांनी त्यांच्या फाऊंडेशनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आतापर्यंत मदत केली आहे. तशीच मदत इतर नागरिकांनी, संस्थांनी करावी असे आवाहन सुद्धा केले आहे.
गेल्या काही दिवसापासून घडलेल्या या घटनेमुळे तेथील रहिवाशांचे पूर्णतः हाल झाले आहेत. अशांना मदतीचा हात म्हणून जीवनावश्यक वस्तू, औषधे, कपडे तसेच घरगुती साहित्य याचे वाटप केएन फाऊंडेशन व संवेदना चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आतापर्यंत करण्यात आले आहेच. तरी नागरिकांनी सुद्धा पुढे येवून त्यांच्या परिने जेवढी होईल तेवढी मदत करावी असे आवाहन संस्थापिका अध्यक्षा कोमल खोचरे (तावरे) यांनी केले आहे.

फोटो ः कोमल खोचरे (तावरे)



Comments