मोबाईल शॉपमध्ये घरफोडी.....
मोबाईल शॉपमध्ये घरफोडी...

पनवेल, दि.१ (वार्ताहर) ः एका बंद मोबाईल शॉपचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी आतमध्ये असलेले मोबाईल, घड्याळे व इतर ऐवज चोरुन नेल्याची घटना पनवेल शहरात घडली आहे.
निखील भागवत (37) यांच्या मोबाईल शॉपच्या दुकानाचे अज्ञात चोरट्यांनी लॉक तोडून व आतमध्ये असलेले विविध कंपनीचे मोबाईल फोन, घड्याळे व इतर ऐवज असा मिळून 41 हजार 900 रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेला आहे. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments