योग्य तो न्याय न मिळाल्यास शिवसैनिक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करणार...
पनवेल / प्रतिनिधी :- पनवेल पालिकेच्या खांदा कॉलोनी सेक्टर ९ येथे ड्रेनेज लाईन जाम झाल्याने परिसरातील दुर्गंधी वाढली, प्रवासात अडचण निर्माण झालीआहे, वयोवृद्ध स्त्री- पुरुष लहान मुले प्रवास देखील करू शकत नाहीत, म्हणून अनेक त्रस्त नागरिकांनी शिवसैनिकांकडे धाव घेतली व या विषयाचे निवेदन शिवसैनिकांनी आज प्रत्यक्षात पाहणी करून सिडकोला दिले निवेदनाची दाखल घेत सिडकोचे अधिक्षक अभियंता मोहिले, सहाय्यक कार्यकारी अभियंता डेकाटे, ठेकेदार भागवत तातडीने घटनास्थळी पोहचले, तसेच सिडको अधिकारी यांनी पाहणी करून लवकरात लवकर आम्ही आपल्या तक्रारीवर मार्ग काढण्याचे आश्वासित केले आहे.
तसेच माणसाच्या जीवनातील पाणी सारख्या अतिमहत्त्वाच्या बाबतीत सिडकोचे प्रशासन नियोजन का करत नाही त्यांना भविष्यातील वाढती लोकसंख्येच्या आधारे पाण्याच्या प्रवाहात वाढ करायला हवी होती असा प्रश्न सिडकोचे मुख्य अधिक्षक अभियंता गजानन दलाल यांना विचारले असता त्यांनी दोन दिवसांत पाणी पुरवठा सुरळीत करू असे आश्वासन दिले. पण त्याच्या सोबत असणारे अधिकारी त्यांनी जणू पाणी विकणाऱ्या ठेकेदार ह्यांच्या टँकर कसे वाढतील ह्यासाठी चुप्पी केली की काय असा प्रश्न समोर येतो, पण त्यावेळी शिवसेना शहर प्रमुख सदानंद शिर्के यांनी एम. जे.पी अधिकारी पांढरपट्टे यांना समोर बोलावून एम जी पी कडून सिडको खांदा कॉलनी साठी किती पाणी पुरवठा केला जातो याची समोरासमोर माहिती घेतली व यामध्ये सिडको अधिकारी यांची बोलती बंदच झाली कारण एम जी पी पुरेसे पाणी पुरवठा करत असल्याचे निदर्शनास आले आपले शिष्टमंडळा सोबत सर्व सोसायटी मध्ये कमी प्रमाणात पाणी येत असल्याचे सिडकोच्या निदर्शनास आणून दिले. सोसायट्या लाखोंच्या खर्चात टँकरने पाणी विकत घेत आहे म्हणून सिडको अधिकाऱ्याने त्यावर दखल घेत तातडीने त्यावर उपाययोजना करण्यात येईल असे आश्वासन दिले .
त्यावर शिवसैनिकांनी योग्य न्याय न मिळाल्यास शिवसैनिक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील असा इशारा ही दिला आहे.
यावेळी शहर प्रमुख सदानंद शिर्के, उपशहर प्रमुख दत्तात्रेय महामुलकर, उपशहर प्रमुख, संपत सुवर्णा, युवासेना उपविधानसभा अधिकारी सुशांत सावंत, महिला शहर संघटिका सानिका मोरे, उपशहरसघटीका असमा खान, उपशहरसघटक संजीव गमरे, उपविभाग प्रमुख जयराम खैरे, शाखाप्रमुख पुंडलिक म्हात्रे, शाखाप्रमुख मंगेश पवार, शाखाप्रमुख अतुल घुग, शाखाप्रमुख अरविंद कासारे, युवासेना शहर चिटणीस सुयश बंडगर,शिवसैनिक तानाजी घारे, भोर काका तसेच शिवसैनिक व खांदा वसाहती मधील अनेक नागरिक उपस्तिथ होते.