पनवेल / प्रतिनिधी :- पनवेल महानगरपालिका नगरसेविका संजना समीर कदम यांच्या नगरसेवक निधीतून बेंचेस बसविणे, हायमास्ट दिवे, ओपन जिम, वृत्तपत्र वाचनालय, डस्टबीन वाटप, या लोकोपयोगी सेवांचा लोकार्पण सोहळा व वृक्षारोपण सेलिब्रेशन सोसायटी सेक्टर १७ च्या बाजूला असणाऱ्या चौपाटीवर करण्यात आला.
याप्रसंगी पनवेल महानगरपालिकेच्या महापौर कविता चौतमोल, सभागृहनेते परेश ठाकूर, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष युवा मोर्चा पनवेल महापालिका मा. उपमहापौर विक्रांत पाटील, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, प्रभाग समिती सभापती अनिता पाटील, मा. सभापती स्थायी समिती नगरसेवक प्रवीण पाटील, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेटकर, खारघर तळोजा मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, नमो नमो मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संतोष शर्मा, सेलिब्रेशन सोसायटीचे पदाधिकारी, घरकुल, स्पॅगेटी सोसायटीचे पदाधिकारी, वास्तुविहार सोसायटीचे पदाधिकारी, सेक्टर १८ मधील विविध सोसायट्यांचे पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक महिला भगिनी, युवा मोर्चाचे पदाधिकारी व श्रमिक सेवा सहकारी संस्थेचे पदाधिकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
वृक्षारोपण या कार्यक्रमासाठी मा. रायगड जिल्हा सरचिटणीस समीर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष करून युवा मोर्चाचे पदाधिकारी सुशांत पाटोळे, राजू आचलकर, प्रणय मोरे, रवी टाक, सोनू सूर्यवंशी, निखिल, सर्जेराव मेंगाणे व सेलिब्रेशन सोसायटीचे पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक यांनी विशेष मेहनत घेतली.
यावेळी पनवेल महानगर पालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांनी परिसराची पाहणी करत या परिसराचे चौपाटीमध्ये रूपांतर करून लवकरात लवकर कसा विकास करता येईल याबाबत अधिकार्यांशी चर्चा केली त्याचप्रमाणे सेलिब्रेशन सोसायटीच्या मागील गेटजवळ असणारा रिकामा प्लॉट ग्राउंडसाठी राखीव करावा याची मागणी मा. सरचिटणीस युवा मोर्चाचे समीर कदम यांनी व सेलिब्रेशन सोसायटीचे पदाधिकारी यांनी परेश ठाकूर यांच्याकडे केली याबाबत आपण सिडकोकडे पाठपुरावा करू असे त्यांनी सांगितले.