पनवेल दि.14 (वार्ताहर): गावठी हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य व चार टाक्या असा मुद्देमाल पनवेल तालुका पोलिसांनी हस्तगत केला आहे.
दिघाटी गाव परिसरात बेकायदेशीररित्या गावठी हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारे गुळाचे अंबवलेले मिश्रणाने भरलेल्या 200 लि. क्षमता असलेल्या चार टाक्या ज्याची किंमत जवळपास 26 हजार इतकी आहे , असा पनवेल तालुका पोलिस ठाण्याचे वपोनि रविंद्र दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि कारोटे, सपोनि पगार, पोना रूपेश पाटील, पोना कानु आदींच्या पथकाने ताब्यात घेऊन एका व्यक्तीविरोधात दारूबंदी अधिनियम कलम 1949चे कलम 65 (फ) द्वारे कारवाई केली आहे.