शेतकरी कामगार पक्ष पनवेल-उरण यांच्या वतीने एक हात मदतीचा...

पनवेल :- रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणची परिस्थिती खूपच बिकट बनली होती. मुसळधार पावसानं चिपळूणच्या वाशिष्ठी नदीला पूर येऊन नदीचं पाणी शहरात शिरलं होत.संपूर्ण शहराला पाण्याचा वेढा पडल्यानं चिपळुणात मदत पोहोचणंही अशक्य बनलं होत. चिपळुण कोकणात तातडीनं मदत पाठवण्याची तय्यारी कोकण शिक्षक आमदार बाळाराम पाटील यांनी कार्यकर्ते पदाधिकारी यांना केली होती. त्यामुळे आज कोकणात सामानाने भरलेले गाड्या घेऊन चिपळूण, पोलादपूर, महाड, माणगांव याठिकाणी पूरग्रस्तांच्या घरोघरी जाऊन सामानाचे किती वाटप करण्यात आले.
यावेळी पनवेल महानगरपालिका नगरसेवक रविंद्र अनंत भगत, राजेश केणी, देवा पाटील, कमलाकर जले, प्रल्हाद चौधरी, चंद्रकांत पाटील, अजित जाधव, संदीप पाटील सहकारी मित्र मंडळी.
Comments