करंजाडेतील सरपंच रामेश्वर आंग्रे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा....



200 जणांनी घेतला आरोग्य शिबिराचा लाभ

कोविड योद्धांचा केला सन्मान

पनवेल,(प्रतिनिधी) -- काही तरी वेगळ करणारी माणस हे वेगळी असतात त्यांचे ध्येय, तत्व, विचार जरा हटके असतात, त्यामध्ये असे व्यक्तीमत्व असणारे करंजाडे ग्रामपंचायतीचे कार्यतत्पर सरपंच रामेश्वर आंग्रे. काही व्यक्तींच्या रक्तातच मुळात लढवय्यापणा आणि संघर्ष करण्याची मोठी ताकद असते. त्यामुळे अशी मंडळी आव्हानाला आव्हान करून सामोरे जातात. यशापयशाची पर्वा न करता सातत्याने मार्गक्रमण करत असतात असे मत सोमवार ता.19 रोजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांच्या वाढदिवसानिमिताने माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी व्यक्त केले.

यावेळी माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, जेष्ठ नेते मुकुंद म्हात्रे, उपसरपंच योगेंद्र कैकाडी, रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईज अध्यक्ष रुपेश जाधव, सदस्य मंगेश बोरकर, पोलीस पाटील कुणाल लोंढे, चंद्रकांत गुजर, करंजाडे शिवसेना शहरप्रमुख गौरव गायकवाड, महिला सदस्य व ग्रा.सदस्य उपस्तित होते.

करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंच रामेश्वर आंग्रे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईज व श्री समर्थ हेल्थ केअर क्लीनिक करंजाडे यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये आरोग्य तपासणी शिबीर, करंजाडे वसाहतीतील कोरोना काळात उल्लेखनीय काम करणाऱ्याना कोविड योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले. यावेळी येथील नागरिकांनी बोलताना सांगितले की, रामेश्वर आंग्रे यांना उदंड आयुष्य लाभावेत तसेच पुढील काळात ते नगरसेवक व्हावेत असे मत यावेळी नागरिकांनी व्यक्त केले. कोरोना काळ असल्यामुळे वाढदिवस उत्साहामध्ये साजरा न करता करंजाडे येथील रायगड जिल्हा प्राथमिक शाळा करंजाडेमध्ये भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शुगर लेवल, रक्त गट, दातांची तपासणी, हाडांची ढिसूळता घनता, स्त्रीरोग तंज्ञाकडून तपासणी व मार्गदर्शन, नेत्र तपासणी यामध्ये डोळे तपासणी, नंबर तपासणे, मोतीबिंदू झालेल्या रुग्नांचे रोटरी मार्फत मोफत मोतीबिंदू सर्जरी करण्यात येणार आहे. यावेळी सुमारे 200 नागरिकांनी आरोग्य तपासणी करून घेतली. त्याचबरोबर कोरोना या महामारीमध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता केलेल्या उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे वाढदिवसानिमिताने फ्रंटलाईन कर्मचारी, सफाई कामगार, नर्स, आया व वार्डबॉय इ व्यक्तींना कोरोना योद्धाना म्हणून सन्मानित करण्यात आहे.

समाजासाठी काम करणाऱ्या मंडळीच्या सत्कारात वेगळे समाधान आहे. कोरोनाच्या कालावधीत समाजासाठी काम करणाऱ्या कोरोना योद्धयांचा सन्मान झाला पाहिजे, यासाठी वाढदिवसाच्या निमिताने त्यांचा विशेष गौरव करण्यात आला.
- रामेश्वर आंग्रे - सरपंच, करंजाडे ग्रामपंचायत
Comments