होप फॉर चिल्ड्रन प्रोजेक्ट कार्यालयाचे उद्घाटन; कोरोना योद्ध्यांचा करण्यात आला सत्कार...
पनवेल दि.२९ (वार्ताहर)- होप फॉर चिल्ड्रन प्रोजेक्ट कार्यालयाचे उद्घाटन वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र जाधव व मा. नगरसेविका तसेच महिला सुरक्षा संघटना महाराष्ट्र राज्याच्या रायगड जिल्हा अध्यक्षा निता माळी यांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
       शहरातील के मॉल येथे सदर कार्यालय उभारले असून यावेळी शिलाई केंद्राचे उद्घाटन मा. नगरसेविका तसेच महिला सुरक्षा संघटना महाराष्ट्र राज्याच्या रायगड जिल्हा अध्यक्षा निता माळी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र जाधव व मा. नगरसेविका तसेच महिला सुरक्षा संघटना महाराष्ट्र राज्याच्या रायगड जिल्हा अध्यक्षा निता माळी यांना कोरोना योद्धा प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास संजिवनी खिल्लारे, वैभव गुरव, स्वाती पवार व प्रभाकर नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.



Comments