इनरव्हील क्लब ऑफ पनवेलचा पदग्रहण सोहळा नव्या उत्साहात संपन्न ...
पनवेल / प्रतिनिधी :-  पनवेलमधील सर्वात जुन्या इनरव्हील क्लबचा ४३ वा पदग्रहण समारंभ दि . ८ जुलै २०२१ रोजी गुगल मीटवर संपन्न झाला . मागील वर्षीच्या प्रेसिडेंट संयोगिता बापट यांनी नवनिर्वाचित प्रेसिडेंट सुलभा निंबाळकर यांचेकडे इनरव्हिलचा पदभार सोपविला . प्रेसिडेंट सुलभा निंबाळकर यांनी आपल्या नवीन कमिटी मेंबर्सची ओळख सर्व सभासदांना यावेळी करुन दिली . यात प्रामुख्याने मानसी परुळेकर - व्हा . प्रेसिडेंट , श्वेता वारंगे - सेक्रेटरी , कानन मिरवणकर - ट्रेझरर , उर्वी पोतदार - आय.एस.ओ . , गौरी अत्रे - एडिटर यांचा समावेश होता . ३ नवीन सदस्यांना इनरव्हील सदस्यत्वही यावेळी देण्यात आले . संकल्पसिद्धी या इनरव्हील बुलेटिनचे प्रकाशन याच कार्यक्रमात डिस्ट्रीक्ट चेअरमन संतोष सिंग यांचे हस्ते करण्यात आले . प्रेसिडेंट सुलभा यांनी करोना काळातही उत्तम काम करण्याचे आश्वासन दिले आणि टाळ्यांच्या गजरात गुगल मीट दणाणले .  यावर्षीचा दुग्धशर्करा योग म्हणजे इनरव्हील डिस्ट्रीक्ट चेअरमन आणि डिस्ट्रीक्ट सेक्रेटरी या आपल्या पनवेलच्याच आहेत . इनरव्हील डिस्ट्रीक्ट चेअरमन संतोष सिंग आणि डिस्ट्रीक्ट सेक्रेटरी डॉ . शोभना पालेकर या दोघींनीही आपली विशेष उपस्थिती कार्यक्रमाला लावली .  इनरव्हील मैत्रिणींनी तसेच Dist . ISO आशाजी , Dist . Editor दिपशिखा . PDC Dist . Cccc नगिना, PDC रोहिणी इतर क्लबच्या इनरव्हील मैत्रिणी यांनी आवर्जुन आपली उपस्थिती नोंदविली आणि कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला .
Comments
Popular posts
नवनियुक्त कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले यांचे पनवेल मध्ये जंगी स्वागत...
Image
दिव्यांग क्रांती संघटना व दिव्यांग उत्कर्ष सामाजिक संस्था तर्फे दिव्यांग दिन सोहळा संपन्न...
Image
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ग्राहक संरक्षण कक्षातर्फे राबविण्यात आले ग्राहक जागृती अभियान...
Image
विना परवानगी आठवडा बाजार व अनधिकृत हातगाडयांवर कारवाई करा - आमदार प्रशांत ठाकूर यांची महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी
Image
महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या आणि लाखो निसर्गप्रेमींनी भेट दिलेल्या ; 'रामबाग' उद्यानाचा वर्धापनदिन सोहळा उत्साहात साजरा
Image