मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खारघरमध्ये महारक्तदान शिबिर..


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणजे महाराष्ट्राच्या कुटुंबप्रमुखाची जबाबदारी स्वीकारणारे नेतृत्व : आयुक्त गणेश देशमुख

रायगड जिल्हा शिवसेनेच्यावतीने रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…
 
पनवेल दि.२५ (वार्ताहर) : 
शिवसेनाप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी यापूर्वीच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या सूचनेनुसार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिरीष  घरत यांनी खारघर येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले. यावेळी गोवंडी मुंबई येथील पल्लवी ब्लड सेंटरच्या सहकार्यातून रक्तदान शिबिर पार पडले.  यावेळी पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख, शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत, रायगड जिल्हा सल्लागार बबन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख उद्घाटक म्हणून पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख हे उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड काळात महाराष्ट्राला वाचाविल्यामुळे त्यांनी खऱ्या अर्थाने एका कुटुंबप्रमुखाची जबाबदारी स्वीकारलेले नेतृत्व असल्याचे मत देशमुख यांनी यावेळी व्यक्त केले. 
        या कार्यक्रमाला जिल्हाप्रमुख श्री. शिरीष घरत, जिल्हा सल्लागार बबन पाटील, यांच्यासह उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, शिरीष बुटाला, रमेश गुडेकर, विधानसभा संघटक दीपक निकम, तालुका संघटक भरत पाटील, महानगरप्रमुख रामदास शेवाळे, तालुकाप्रमुख एकनाथ म्हात्रे, विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, पनवेल तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, गुरूंनाथ पाटील, उपमहानगरप्रमुख दिपक घरत, उपमहानगर संघटक आत्माराम गावंड, खारघर शहर प्रमुख शंकरशेठ ठाकुर, सदानंद शिर्के, डी.एन. मिश्रा, अच्युत मनोरे, राकेश गोवारी, प्रवीण जाधव, युवसेनेचे उपजिल्हा अधिकारी अवचित राऊत, नितिन पाटील, पराग मोहिते, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटीका सौ. कल्पना पाटील, रेवती सकपाळ, शुभांगी शेलार, सुजाता कदम, मंदा जंगले, अर्चना कुळकर्णी आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments