खैराटवाडी येथे आदिवासींसाठी रानभाज्या प्रदर्शन व विक्री महोत्सव....
पनवेल / वार्ताहर दि.०८ :- पनवेल तालुक्यातील कर्नाळा किल्ल्याच्या  परिसरात असलेल्या आदिवासी बांधवांना अर्थार्जनाचे साधन म्हणून युसुफ मेहेरअली सेंटर आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या समाजकार्य विभागातील समाजकार्य प्रशिक्षणार्थींनी बुधवारी खैराटवाडी येथे रान भाज्या प्रदर्शन व विक्री महोत्सवाचे आयोजन केले होते.
प्रकल्प संचालक सुरेश रासम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या महोत्सवात महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाचे निवृत्त उपसचिव प्रकाश दुधलकर, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागाचे सतीश शेरमकर,राधिका वाणी, ज्योती वाघ, पनवेल तालुका कृषी अधिकारी ईश्वर चौधरी, कृषी सहाय्यक पी.बी.बोराडे, व्ही.यु. पाटील, प्रसाद पाटील, कृषि मित्र लक्ष्मण पाटील ग्रामपंचायत सदस्य तुलसा बाई हापसे, सुनीता वाघमारे, युसुफ मेहर अली सेंटरचे रामदास गुरमे बाळकृष्ण सावंत मालती म्हात्रे अंजना पवार यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते या प्रदर्शनात आदिवासी बांधवांनी जंगलातील कुरडू, भारांगा, शेवाळा, बाफळी, टाकळा, तेरी, माठ, कंटोळी, करांदे यासारख्या रानभाज्या विक्रीस ठेवल्या होत्या दरम्यान यावेळी युसुफ मेहेरअली सेंटरच्या वतीने उपस्थित आदिवासी महिलांनी रानभाज्या विक्री केंद्र चालविण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कडून आर्थिक मदततीचे अर्ज प्रकल्प अधिकाऱ्यांकडे दिले तर कृषी विभागाकडून आदिवासी शेतकऱ्यांना तुरीचे बियाणे वाटप करण्यात आले सदर  महोत्सवाचे आयोजन तथा नियोजन समाजशास्त्र पदवीचे शिक्षण घेणारे विध्यार्थी सामाजिक कार्यकर्ते रत्नाकर घरत, दत्ता शिरसाट, पराग गावडे, शंकर अलदे यांच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल उपस्थितांनी अभिनंदन केले.
Comments
Popular posts
नवनियुक्त कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले यांचे पनवेल मध्ये जंगी स्वागत...
Image
दिव्यांग क्रांती संघटना व दिव्यांग उत्कर्ष सामाजिक संस्था तर्फे दिव्यांग दिन सोहळा संपन्न...
Image
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ग्राहक संरक्षण कक्षातर्फे राबविण्यात आले ग्राहक जागृती अभियान...
Image
विना परवानगी आठवडा बाजार व अनधिकृत हातगाडयांवर कारवाई करा - आमदार प्रशांत ठाकूर यांची महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी
Image
महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या आणि लाखो निसर्गप्रेमींनी भेट दिलेल्या ; 'रामबाग' उद्यानाचा वर्धापनदिन सोहळा उत्साहात साजरा
Image