पनवेल दि. ५ (वार्ताहर) - काळी जादू व तंत्र मंत्र करून प्रियकराला वश करून देण्याचा बहाणा करून एका बंगाली बाबाने खारघरमध्ये राहणाऱ्या २६ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनियर तरूणीकडून तब्बल ४ लाख ५७ हजार रूपये उकळल्याची घटना घडली आहे.
वसीम रहिस खान उर्फ बाबा कबीर खान असे या बाबाचे नाव असून खारघर पोलिसांनी त्याच्याविरूद्ध फसवणूकीसह अनिष्ट अघोरी कृत्य प्रतिबंधक व निर्मुलन, तसेच काळी जादू या कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे.