पनवेल, दि.९ (वार्ताहर) ः तीर्थरूप डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या मार्फत वृक्षारोपण - तीर्थरूप डॉ श्री अप्पासाहेब धर्माधिकारी व रायगड भूषण सचिनदादा धर्माधिकरी यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल तालुक्यातील पारगाव येथे वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी ग्रुप ग्रामपंचायत पारगाव सरपंच सौ अहिल्या बाळाराम नाईक, सदस्य निशा रत्नदीप पाटील, मा उपसरपंच सुशील कांता तारेकर, मा सरपंच कवी तारेकर यांच्या उपस्थितीत वृक्ष लागवड करण्यात आली.