पनवेल, दि.१ (संजय कदम) ः कळंबोली सेक्टर १५ येथे पंतप्रधान आवास योजनेंतर्गत सिडकोच्या माध्यमातून उभारण्यात आलेली घरे ही अत्यंत निटनेटकी व नियोजनबद्ध पद्धतीने उभारली असून त्यांनी बांधलेल्या या घरांमुळे अनेकांचे घरांचे स्वप्नपूर्ती झाल्याचे मत महाराष्ट्र राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज हस्तांतरण कार्यक्रमाच्या घर मालकांना चावी देताना व्यक्त केले.
यावेळी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह खा.राजन विचारे, सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ.संजय मुखर्जी, डॉ.कैलास शिंदे, अश्विन मुदगल, शिवसेना जिल्हाप्रमुख शिरिष घरत, जिल्हा सल्लागार बबन पाटील, महानगरप्रमुख रामदास शेवाळे, काँग्रेस नेते सुदाम पाटील, उपमहानगरप्रमुख दिपक घरत, कळंबोली शहरप्रमुख डी.एन.मिश्रा, हाऊसिंग विभागाचे फैय्याज खान, गोडबोले, कराड, माहिती विभागाच्या प्रिया रतांबे यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. सिडकोच्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सिडकोने निर्माण केलेल्या 1550 घरांपैकी काही घरांच्या घरमालकांना चावी देण्याचा कार्यक्रम 1 जुलै औचित्य साधून पार पडला. 34 हेक्टर जमिनीमध्ये ही योजना सिडको मार्फत राबविण्यात येत आहे. प्रत्येक रुम ही अत्यंत निटनेटकी, दोन बाथरुम, हॉल चिकन व छोट्या कुटुंबाला लागेल अशी रुम बांधण्यात आल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यासाठी बी.जी.शिर्के यांनी विशेष काम केले असून लॉकडाऊनच्या काळामध्ये केंद्रातर्फे देण्यात येणारे दिड लाख रुपये तसेच राज्य शासनामार्फत देण्यात येणारे एक लाख रुपये अजूनही सिडकोला देण्यात आले नाहीत. तरीही काम थांबवू नका व ज्यांची घरे पूर्ण झाली आहेत त्यांना तात्काळ घराच्या चाव्या द्या अशा सूचना सिडकोच्या अधिकार्यांना दिल्या होत्या व सिडकोने सुद्धा प्राथमिक स्वरुपात ही कामे केली आहेत व सुंदर अशी वास्तू उभारल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 13 मजल्याच्या इमारती उभारण्यात आल्या असून साधारण याची किंमत साडे अठरा लाखाच्या आसपास आहे. या इमारतीचा मेंन्टेनन्स 5 वर्षे येथील लाभार्थींनी भरायचा नाही आहे. तसेच पाणी संदर्भात सुद्धा 10 वर्षे वॉटर क्युरिफायरिंग करण्यात येणार आहे. त्याचा फायदा येथील रहिवाशांना होणार आहे. आज वेगवेगळ्या ठिकाणी सुरूवातीला काही जणांना प्राथमिक स्वरुपात घरांचे वाटप करण्यात येत असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
कोट
आमचे स्वप्न पूर्ण झाले. एक ठिकाणी व चांगल्या वास्तूमध्ये आम्ही लवकरच रहायला येवू, सिडकोने यासाठी 13 मजली उभारलेली इमारत ही अत्यंत देखणी यासाठी आम्ही केंद्रासह राज्य शासनाचे आभार मानत आहोत.
: उमा चंद्रकांत शिंदे, लाभार्थी