पनवेल दि. २६ (संजय कदम): भरधाव वेगाने जाणाऱ्या आयशर कंपनीच्या कंटेनरने एसटीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात सहा जण जखमी झाल्याची घटना पनवेलजवळील मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेजवळ कोन ब्रीज पनवेल एक्झिटवर घडली आहे. आयशर कंटेनर क्र.-एमएच 04 एचवाय 5281 हा घेऊन त्याचा चालक भरधाव वेगानेपनवेलजवळील मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेजवळ कोन ब्रीज पनवेल एक्झिटवरून जात असताना त्याने एसटी बस क्र.-एमएच 14 बीटी 3253 हिस पाठीमागून धडक देऊन झालेल्या अपघातात एसटी बसचालक मुदस्सीर रसुलसाब शेख (वय-37), कावेरी पाटील (वय-21), दत्ता पवार (वय-40), रंजना शिराळकर (वय-56), वर्षा परंजापे (वय-53), किशोर खांडे भरड (वय-32) हे जखमी झाले असून दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर कंटेनरचालक पसार झाला आहे. या अपघाताची नोंद पनवेल तालुका पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
कंटेनरची एसटीस धडक ; सहा प्रवासी जखमी
कंटेनरची एसटीस धडक ; सहा प्रवासी जखमी....