शेकाप युवानेते किरण दाभणे यांच्या जन्मदिनी पाले खुर्द शाळेच्या नूतन इमारतीचे लोकार्पण....



पनवेल / वार्ताहर :- शेतकरी कामगार पक्षाचे युवानेते किरण दाभणे यांच्या जन्मदिनाच्या औचीत्याने पाले खुर्द येथील रा जी प शाळेच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा बुधवार दिनांक 7 जुलै रोजी संपन्न झाला.आमदार बाळाराम पाटील यांच्या शुभहस्ते आणि माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
      यावेळी आमदार बाळाराम पाटील आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, याठिकाणी किरण दाभणे यांच्या पुढाकाराने निर्माण झालेल्या रायगड जिल्हा परिषद शाळेचे नूतन इमारतीचे लोकार्पण करताना अत्यंत समाधान लाभत आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून ज्या पद्धतीने आम्ही विकासकामे करत होतो तो विकास आज पनवेल महानगरपालिकेच्या मध्ये समाविष्ट झाल्यामुळे खुंटलेला आहे.रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांच्या डागडूजीसाठी आम्ही आणलेला निधी देखील महापालिका वापरू शकली नव्हती.अखेरीस आम्ही पुन्हा प्रयत्न करून तीन लाख रुपयांचा निधी मंजूर करवून आणला आहे.या व्यातरिक्त गेल्या चार वर्षात येथील विभागात विकास कामे करण्यास महापालिका असमर्थ ठरत आहे.म्हणून मला वाटते की प म पा म्हणजे नाव सोनू बाई आणि हाती कथिलाचा वाळा! अशी परिस्थिती आहे.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष काशिनाथ पाटील म्हणाले की, कोणे एकेकाळी सधन असलेल्या या ग्रामपंचायती पनवेल महानगरपालिका हद्दीत समाविष्ट झाल्यानंतर त्यांची अक्षरशः रया गेली आहे. आज येथे विकास कामांसाठी संघर्ष करावा लागत आहे. अनेक पातळ्यांवर झगडावे लागत आहे. पाले खुर्द येथील शाळेच्या बाबत किरण दाभणे यांनी माझ्याकडे प्रस्ताव आणला असता अनेक निकष वाकवून आम्ही या शाळेच्या पुनर्निर्मिती साठी परवानग्या दिल्या आहेत.परंतु अशा किमान 50 शाळा दुरुस्तीच्या प्रतिक्षेत आहेत. आपले जन्म दिवस सामाजिक उपक्रमांतून साजरे करणाऱ्या किरण यांच्यासारख्या कार्यकर्त्यांचा मला अभिमान वाटतो.
किरण  दाभणे यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित लोकार्पण सोहळ्याला आमदार बाळाराम पाटील यांच्या समवेत, पनवेल नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे,शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष काशिनाथ पाटील,बॉम्बे ब्रेवरेज चे क्लस्टर हेड माणिक चोप्रा,रिजनल हेड पंकज चोप्रा, पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल महापालिका जिल्हा चिटणीस गणेश कडू, नगरसेविका प्रज्योती प्रकाश म्हात्रे, उज्वला विजय पाटील, प्रिया विजय भोईर,सारिका अतुल भगत, प्रीती जॉर्ज म्हात्रे,रवींद्र भगत,महेश पाटील,माजी नगरसेवक कल्याण डोंबिवली म. पा., रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक गणपत बुवा देशेकर आदी मान्यवरांच्या समवेत ग्रामस्थ, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट

येथील ग्रामस्थांनी जेव्हा शाळेच्या विदारक परिस्थिती बाबत सांगितले तेव्हा पासून मी विविध पातळ्यांवर सक्रिय होत इमारत उभारणीचे काम करू लागलो. आमच्या गावाचा पनवेल महानगरपालिकेमध्ये समावेश झाला असल्या कारणामुळे परवानग्या प्राप्त करण्यासाठी अनेक अडथळे येत होते. बॉम्बे ब्रेवरिज ने त्यांच्या सी एस आर फंडातून 40 लाख रुपये दिल्याने आज ही इमारत उभी राहिली आहे.मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो.तसेच मटकर साहेबांनी देखील खूप सहकार्य केले त्यांचे देखील मी आभार मानतो.

शेकाप युवानेते

किरण दाभणे.

चौकट

असे म्हणतात की एका यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो. परंतु माझ्या बाबतीत मात्र अगदी उलटे झाले आहे. एक नगरसेविका म्हणून, पक्षाची पदाधिकारी म्हणून विविध पातळ्यांवर काम करत असताना मला माझे पती प्रोत्साहित करतात. आज मी जे काही यश प्राप्त केले आहे त्याचे सर्व श्रेय माझे पती किरण दाभणे यांचे आहे. पुरुषांनी अशाच प्रकारे महिलांना प्रोत्साहन दिल्यास अनेक कर्तुत्ववान महिला समाज उद्धार करण्यासाठी हिरीरीने पुढे येतील.

नगरसेविका 
अरुणा किरण दाभणे.
Comments