पनवेल परिसरात दोन ठिकाणी लागल्या आगी....
पनवेल परिसरात दोन ठिकाणी लागल्या आगी...

पनवेल, दि.१४ (वार्ताहर) ः पनवेल परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी लागलेल्या आगीत जिवीतहानी झाली नसली तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे.
कामोठे येथील एम जी एम रुग्णालयातील यू पी एस सी विभागात रात्रीच्या सुमारास आग लागण्याची घटना घडली. आगीमुळे मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या धुरामुळे रुग्णालयात दाखल काही रुग्णांना त्रास झाल्याने रुग्णांना तात्काळ इतर विभागात हलवण्यात आले. घटनास्थळी पोहोचलेल्या कळंबोली अग्निशमन दलाने परस्थिती नियंत्रणात आणल्याची माहिती अग्निशमन विभागाकडून देण्यात आली. तर दुसर्‍या घटनेत पनवेल शहरातील महानगरपालिका शॉपिंग कॉम्प्लेक्समधील मीटर केबिनमध्ये शॉक सर्कीटमुळे आग लागून 12 मीटर जळाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहोचून आग त्यांनी आटोक्यात आणली आहे. सदर आग ही शॉक सर्कीटमुळे लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे.
Comments