सिडकोकडून सेवा हस्तांतरीत करण्याविषयी आयुक्तांनी घेतली बैठक



पनवेल,दि.23 : सिडकोकडून विविध सेवा पनवेल महापालिकेला हस्तांतरीत करण्याच्या पार्श्वभूमीवर आज(23 ऑगस्ट) आयुक्त गणेश देशमुख यांनी उपायुक्त व संबधित विभाग अधिकारी यांची बैठक आयुक्तांनी घेतली.

यावेळी उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त सचिन पवार, सहाय्यक आयुक्त धैर्यशील जाधव, सहाय्यक आयुक्त वंदना गुळवे, कार्यकारी अभियंता संजय कटेकर, शहर अभियंता संजय जगताप,मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी, अग्निशमन विभाग प्रमुख अनिल जाधव, अधिकारी उपस्थित होते.

सध्या सिडको विभागातील घनकचऱ्याची सेवा महापालिका पुरवित असून येत्या काळात अग्निशमन, उद्याने, ड्रेनेज, विद्युत, रस्ते-गटारी  या सेवा देखील पालिका आपल्याकडे घेणार आहेत. याबाबत या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली.
सिडकोकडून सेवा हस्तांतरीत केल्यावरती त्यांच्या देखभालीचा अंदाजित खर्च, त्याची देखभाल करण्याकरिता लागणारे मनुष्यबळ, प्रत्येक नोडमध्ये सिडकोने पुर्ण केलेली कामे तसेच अपूर्ण कामे यांचा सविस्तर आढावा घेऊन या दृष्टीने प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना आयुक्तांनी यावेळी संबधित अधिकाऱ्यांना दिल्या.
Comments