बंद असलेले पथदिवे व हायमास्क त्वरीत चालू करण्याची नगरसेवक राजू सोनी यांची आयुक्तांकडे मागणी....
पनवेल दि.०९ (संजय कदम)- पनवेल शहर परिसरात अनेक ठिकाणी पथदिवे व हायमास्क बंद असून त्यामुळे अपघात किंवा अनुचित प्रकार घडू शकतात तरी नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पथदिवे व हायमास्क त्वरीत चालू करण्याची मागणी नगरसेवक राजू सोनी यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त देशमुख यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
            या निवेदनात नगरसेवक राजू सोनी यांनी म्हटले आहे की, प्रभाग क्र.-19मधील विविध ठिकाणी पथदिवे तसेच काही चौकात बसविण्यात आलेले हायमास्क दिवे काही महिन्यांपासून बंद आहेत. त्यामुळे नागरिकांना रात्रीच्या वेळेस ये-जा करताना गैरसोय होत आहे. त्याचप्रमाणे अशा ठिकाणी कधीही अनुचित प्रकार घडू शकतात. अंधार असल्याने चोऱ्या व लुटमारीची शक्यता नाकरता येणे शक्य नाही. तरी नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पथदिवे व हायमास्क त्वरीत चालू करण्याची मागणी नगरसेवक राजू सोनी यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त देशमुख यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
          
Comments