कामोठे पोलिसांचा हुक्का पार्लरवर छापा, हुक्का पार्लर चालकासह १४ जणांवर कारवाई...


पनवेल दि. २६ (वार्ताहर) - कामोठे सेक्टर-19 मधील टुडे-शिवम या इमारतीत बेकायदेशीररीत्या सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर कामोठे पोलिसांनी छापा मारुन हुक्का ओढण्यासाठी बसलेल्या ग्राहकासह हुक्का पार्लर चालक अशा एकुण १४ जणांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी हुक्का ओढण्यासाठी लागणारे साहित्य व तंबाखुजन्य पदार्थ जफ्त केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्य शासनाने रेस्टारंट, बार व इतर आस्थापना सुरु ठेवण्यासंदर्भात नियम व अटी लागु केलेले असताना सदरचे हुक्का पार्लर बिनदिक्कतपणे सुरु ठेवण्यात आले होते.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मनाई आदेश लागु करुन बार,रेस्टारंट सुरु ठेवण्यासाठी नियम व अटी घातल्या आहेत. असे असतानाही, कामोठे सेक्टर-19 मधील टुडे शिवम या इमारतीतील शॉप नं. 7 मध्ये मध्यरात्री उशीरापर्यंत बेकायदेशीररीत्या हुक्का पार्लर सुरु असल्याची माहिती कामोठे पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे सहाय्यक पोलीस नाजुकाताई पाटील व त्यांच्या पथकाने कामोठे पोलिसांनी मध्यरात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास सदर हुक्का पार्लरवर छापा मारला. यावेळी सदर हुक्का पार्लरमध्ये कोव्हीड-19 च्या पार्श्वभुमीवर राज्य शासनाने लागू केलेल्या अधिसुचनांचे व अटिंचे उल्लंघन करण्यात आल्याचे आढळुन आले.  तसेच सदर हुक्का पार्लरमध्ये कुठल्याही प्रकारचे सामाजिक अंतर न ठेवता, सदरचे हुक्का पार्लर बेकायदेशीररीत्या मध्यरात्रीपर्यंत सुरु ठेवण्यात आल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी सदर हुक्का पार्लरचा चालक रोहीत हरीलाल सचदेव (27) व हुक्का पार्लरमध्ये काम करणारे 4 व्यक्ती तसेच त्याठिकाणी हुक्का ओढण्यासाठी बसलेले 9 ग्राहक अशा एकुण 14 जणांवर कोरोनाच्या परिस्थितीत नियमांचे उल्लंघन करणे यासह विविध कलमांखाली गुन्हे दाखल करुन त्यांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी हुक्का ओढण्यासाठी लागणारे साहित्य व तंबाखुजन्य पदार्थ जफ्त केले आहे.
Comments