मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांच्या जनसेवा कार्यालयात मोफत राखी प्रशिक्षण वर्ग संपन्न...
पनवेल / प्रतिनिधी :- प्रभागातील माता-भगिनींचा कौशल्य विकास व्हावा व व्यवसायात सुद्धा त्यांनी पुढे यावे यासाठी नगरसेवक विक्रांत पाटील हे नेहमीच तत्पर असतात आणि उपक्रम राबवित असतात.त्याचाच एक भाग म्हणून प्रभाग १८ मधील माता-भगिनींना प्रोत्साहन मिळावे म्हणून नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या जनसेवा कार्यालयात  "मोफत राखी प्रशिक्षण वर्ग" आयोजित करण्यात आले होते. 
या प्रशिक्षण वर्गात घरातील वस्तूंपासून राखी कश्या प्रकारे तयार करावी याचं प्रशिक्षण देण्यात आलं.सौ सतविंदर कौर ठाकूर यांनी आलेल्या मुलींना आणि महिलांना राखी बनवण्याचे प्रशिक्षण दिले.आतापर्यंत आपल्या भावाला आणि आप्तेष्टांना बाजारातून खरेदी केलेली राखी बांधत होतो आता स्वतः तयार केलेली राखी बांधू असे मनोगत प्रशिक्षण वर्गाला आलेल्या माता-भगिनींनी व्यक्त केले. नगरसेवक विक्रांत पाटील प्रभागातील माता-भगिनींच्या कला गुणांना प्रोत्साहन मिळावे यासाठी नेहमीच तत्पर असतात याबद्दल आलेल्या सर्व माता-भगिनींनी समाधान व्यक्त केले.
माता-भगिनींनी चांगला प्रतिसाद लाभलेल्या या मोफत राखी प्रशिक्षण वर्गाला सौ मोहिनी विक्रांत पाटील, सौ स्नेहल पाटील धमाले आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
Comments