शिवसेना कळंबोली शाखेस मिळणार खासदार निधीतून रुग्णवाहिका ; खा.श्रीरंग बारणे यांचे आश्वासन

पनवेल वैभव / प्रतिनिधी  :- कळंबोली वसाहतीत जवळपास दोन ते अडीच लाख लोकसंख्या असून,आपल्या सद्य स्थितीत देशात निर्माण झालेल्या कोरोना संसर्ग काळात देखील शिवसेना पक्षाच्या स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या मेहनतीने कोरोना रुग्णांना लागणारी सर्व प्रकारची मदत उपलब्ध करून दिली आहे. 
कोरोना काळात रुग्णांची  ने-आण करण्यासाठी लागणाऱ्या रुग्णवाहिकेची आवशक्यता जाणवल्याने तसेच अनेक ठिकाणी रुग्णवाहिका चालकांनी रूग्णांच्या नातेवाईकांची अडवणूक केली आहे. तसेच कळंबोली सारख्या मोठी लोकसंख्या  असलेल्या वसाहतीत रुग्णांच्या मदती करिता शिवसेनेकडे आपली स्वतःची रुग्णवाहिका उपलब्ध झाल्यास रुग्णांची मदत करता येईल. यासाठी जिल्हाप्रमुख शिरीष घरत, महानगर प्रमुख रामदास शेवाळे, विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, शहरप्रमुख डी एन मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली कळंबोली शहर समन्वयक गिरीश धुमाळ यांनी मावळचे खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांना निवेदन देऊन, खासदार निधीतून कळंबोली पक्ष कार्यालयाला सुसज्ज अशी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याकरिता विनंती केली आहे. यावेळी खासदार श्रीरंग बारणे यांनी लवकरात लवकर रुग्णवाहिका उप्लब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन दिले. 

याप्रसंगी उपशहर प्रमुख नारायण फडतरे, उपविभाग प्रमुख(खारघर) बापू ‌‌‌ढेंबरे, उपशहर प्रमुख  सूर्यकांत म्हसकर, विभाग प्रमुख आकाश विलास शेलार, विभाग संघटक आशुतोष शेंडगे, उपविभाग संघटक विकास मिश्रा उपस्तिथ होते.
Comments