टेम्पोच्या धडकेने मोटार सायकलवरील आई व मुलगा जखमी.....
पनवेल, दि. १४ (संजय कदम) ः भरधाव टेम्पोच्या धडकेने मोटार सायकलवरील आई व मुलगा जखमी झाल्याची घटना तळोजा फेज-1 येथून तळोजा फेज-2 कडे जाणार्या ब्रीज क्रॉस करून उजव्या बाजूला वळल्यानंतर असलेल्या रस्त्यावर घडली आहे.
सऊद मोहम्मद हुसेन शेख (31) हा त्याच्या ताब्यातील मोटार सायकलवरून त्याच्या आईला घेवून वरील ठिकाणावरुन जात असताना टेम्पो चालकाने पुढील बाजूस येवून धडक दिल्याने झालेल्या अपघातात ते दोघे जखमी झाले आहेत. या घटनेनंतर टेम्पो चालक पसार झाला असून त्याचा शोध तळोजा पोलीस करीत आहेत.