4k चॅनल व साप्ताहिक गौरव दर्शन तर्फे पनवेल तालुक्यातील शिक्षकांचा सन्मान..

पनवेल / वार्ताहर  :  -  4K चॅनल चे संलग्न साप्ताहिक गौरव दर्शन तर्फे नुकत्याच झालेल्या शिक्षक दिनाचे औचित्य साधून पनवेल तालुक्यातील आपल्या शाळेत उल्लेखनीय कार्य केलेल्या  शिक्षकांचा स्मरणचिन्ह देऊन  सन्मान करण्यात आला . सदर कार्यक्रमास बाबासाहेब चिमणे प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग, पनवेल महानगर पालिका, तसेच महेश खामकर,  गट शिक्षण अधिकारी,पंचायत समिती , पनवेल. मंदार पणवेलकर, प्रसिद्ध उद्योजक एल,आर. वेंकटरामन, के ए बंठिया हायस्कूलचे प्राचार्य  भगवान माळी,  शिक्षण महर्षी रमेश तुपे या सर्व मान्यवरांच्या हस्ते शिक्षकांना सन्मानित करण्यात आले.
या वेळेस 4k चॅनल आणि साप्ताहिक गौरव दर्शन चे संपादक गौरव जहागीरदार यांनी मान्यवरांना शाल आणि स्मृती चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी 4k चॅनल चे संपादक गौरव जहागीरदार यांनी सांगितले की "लोकशाही चा चौथा स्तंभ पत्रकारिता करत असताना समाजात जे काही चालले आहे ते लोकांना दाखवणे भाग असते आपल्या समाजात चांगल्या वाईट घटना घडत असतात ते आमच्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून लोकांना दाखवावे लागते. तसेच समाजात काही लोक चांगले कार्य करत असतात त्यांच्या कार्याला प्रसिद्धी देणे आमचे कर्तव्य असते. शिक्षक हा आपल्या आयुष्याचा भाग असतो लहापणापासून आपल्याला शिक्षक घडवत असतो आपल्या आयुष्यला वळण देत असतो अश्या शिक्षकांचा सन्मान करणे क्रमप्राप्त आहे , ज्या मुळे त्यांना आपले कार्य करण्याची प्रेरणा मिळेल व देशाची नवीन पिढी योग्यरीत्या घडवतील म्हणून हा शिक्षकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे तसेच  पुढेही असेच सामाजिक आणि लोकांना प्रेरणादायी उपक्रम राबवू असें सांगितले.
याप्रसंगी व्ही.व्ही पाटील, शितळकुमार शिंदे,  नंदकुमार जाधव, चंद्रकांत मढवी, विलास पाटील, वैशाली जगदाळे, पंकज दिलीप भगत, सपना म्हात्रे, मनोज कडकिया,संदीप नेरकर,अनवर शेख, अंतुले सर या सर्व शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला SGT इंटरनॅशनल स्कुल चे संस्थापक रमेश तुपे , उत्कल घाडगे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन SGT इंटरनॅशनल स्कुल चे प्रिंसिपॉल सचिन अवाले यांनी केले.
Comments