काळुंद्रे गावात जाणाऱ्या रस्त्यावरील खड्डे भरण्यास सुरुवात; नगरसेवक तेजस कांडपिळे यांचा पाठपुरावा
पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महापालिका हद्दीतील काळुंद्रे गावात जाणार्‍या रस्त्यावर अनेक ठिकाणी पडलेले खड्डे गणेशोत्सवापूर्वी बुजवण्याची मागणी नगरसेवक तेजस कांडपिळे यांनी सिडकोच्या कार्यकारी अभियंत्यांकडे पत्र देऊन केली होती. त्याची दखल घेऊन मंगळवारी (दि. 7) तेथील खड्डे भरण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

पनवेल महापालिका स्थापन झाली तेव्हा महापालिकेत बाजूचा ग्रामीण भाग व सिडको वसाहतीचा समावेश करण्यात आला. काळुंद्रे गाव हे प्रभाग क्रमांक 20मध्ये सामील करण्यात आले. या गावात  जाणारा रस्ता अतिशय खराब झाला आहे. अनेक ठिकाणी खड्डे पडले होते. त्यामुळे त्या गावात व पुढील गावात जाणार्‍या नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. खड्ड्यांमुळे गणेशोत्सावाच्या वेळी गावात गणेशमूर्ती नेणे अवघड झाले होते. सिडकोने या रस्त्याचे टेंडर काढले असून नोव्हेंबर महिन्यात कामाला सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात येत होते.

या प्रभागाचे नगरसेवक तेजस कांडपिळे यांनी आमदार प्रशांत ठाकूर व महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली  सिडकोच्या कार्यकारी अभियंता यांना पत्र देऊन गणेशोत्सवापूर्वी पडलेले खड्डे बुजवण्याची मागणी केली होती. सिडकोच्या बांधकाम विभागाने त्यांच्या पत्राची दखल घेऊन मंगळवारपासून या रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम सुरू केले. या वेळी नगरसेवक तेजस कांडपिळे यांनी स्वतः उपस्थित राहून काम करून घेतल्याबद्दल काळुंद्रे गावातील व प्रभाग 20 मधील नागरिकांनी त्यांना धन्यवाद दिले.
Comments