पनवेल / प्रतिनिधी :- पनवेल च्या नागरिकांच्या लसीकरण घेण्यासाठी अडचणी पहाता येणाऱ्या तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी पनवेल महानगरपालिका नगरसेवक अजय तुकाराम बहिरा यांनी पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक २० तक्का येथील रहिवाशांनाच्या सोयीसाठी लसीकर सेंटरची मागणी केली होती, त्यानुसार पनवेल महानगरपालिका मार्फत तक्का मराठी शाळेत डॉ. महाजन यांच्या टीम कडून आज मोफत लसीकरनाला सुरवात करण्यात आली. या दिवशी २२० कोविशिड या लसीचा डोस देण्यात आला. हे लसीकरण दर शनिवारी तक्का येथे सुरू राहील तर भिंगारी येथे शुक्रवारी काळूद्रे येथे सोमवार चालू करण्यात आले.असून लवकरच पोदी येथे ही चालू करण्यात येईल.
तक्का येथील लसीकर केंद्रांला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून भिंगारी व काळुद्रे येथे ही नागरिकांच्या सोयी साठी केंद चालू करण्यात येणार आहे.
या कामासाठी महानगरपालिका आयुक्त,आमदार प्रशांत ठाकूर, महानगरपालिका नेते परेश ठाकूर आदी चे सहकार्य लाभल्याने नगरसेवक अजय बहिरा व तेजस कांडपीळे यांनी नागरिकांनी त्यांचे आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमाला नगरसेवक अजय बहिरा नगरसेवक तेजस कांडपीळे, शहर अध्यक्ष जयंत पगडे, माजी नगरसेवक प्रभाकर बहिरा, वार्ड अध्यक्ष रघुनाथ बहिरा, माजी नगरसेवक संदीप बहिरा ,युवा नेते प्रतीक बहिरा ,जितेंद्र खुंटकर , किरण बहिरा, नितेश बहिरा, भूषण पिल्ले, सिद्धी मुबंईकर, सिद्धेश बहिरा, पार्थ बहिरा, रोशन बहिरा आदी मान्यवर उपस्थित होते