हुवेई कंपनीच्यावतीने व पनवेल पोलिसांच्या पुढाकाराने पनवेल परिसरातील गरजूंना जीवनावश्यक किटचे वाटप

पनवेल, दि.२४ (संजय कदम) ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अनेकांचे उद्योगधंदे बंद पडले असून त्यांना खाण्यापिण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. समाजातील गरीब व तळागाळातील घटकांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. ही अडचण लक्षात घेता हुवेई कंपनीने पनवेल परिसरातील 585 गरजवंत कुटुंबाना मदतीचा हात म्हणून आज (शुक्रवार दि.24 सप्टेंबर) शहरातील सिंधी पंचायत सभागृह, गोखले सभागृह व पळस्पे बिट परिसर येथे जीवनावश्यक किटचे वाटप करण्यात आले. 
यात प्रामुख्याने अन्नधान्यासह कोरोना खबरदारीच्या अनुषंगाने मास्क, सॅनिटायझर, साबण तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी वह्यांचे वाटपही करण्यात आले. यापूर्वी हुवेई कंपनीचे एक्सिक्युटिव्ह डायरेक्टर हर्ष खुराना, पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे, अक्षयपात्रचे जनरल मॅनेजर सुरेश निमोणकर, गौरांग खुराना, के के कांचन, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश दळवी, सहाय्यक पोलीस निरीक्षक निशांत धनवडे, अंकुश तरटे, अमर वाघमारे, कांचन घरत यांच्या उपस्थितीत करंजाडे येथे वाटप करण्यात आले होते. 
तशाच प्रकारे आज परिमंडळ 2 चे सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनावणे, वपोनि अजयकुमार लांडगे, पो.नि.विजय कादबाने, सहा.पो.नि.हुलगे आदींच्या उपस्थितीत आज अशा प्रकारे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे गोरगरीब जनतेला एक मदतीचा चांगला हात मिळाला आहे. तसेच पोलिसांनी सुद्धा सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम राबविल्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. 

Comments