पर्यावरण संवर्धन अतुलनीय कार्याबद्दल सुधीर पाटील यांचा गौरव...

पनवेल वैभव वृत्तसेवा : - 
पर्यावरण संवर्धन अतुलनीय कार्याबद्दल आर्या प्रहारचे संपादक सुधीर पाटील यांचा लायन्स क्लब पनवेल रत्ना तर्फे यथोचित गौरव करण्यात आला.
 पनवेल तालुक्यातील धोदाणी येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात लायन्स क्लबच्या सरोज शर्मा जिल्हाध्यक्षा पर्यावरण यांच्या हस्ते सुधीर पाटील यांना गौरविण्यात आले. यावेळी लायन्स क्लब ऑफ पनवेल रत्नाचे अध्यक्ष प्रदीप भट्टाचार्य,गाव दत्तक योजनेचे अध्यक्ष विंग कमांडर राजेंद्र महानुभाव,महेश किनरे सचिव,सर्व्हिस चेअर परसन दिनेश करिपारा,सरपंच हर्षदा चौधरी,सोमनाथ चौधरी,रिजन चेअर परसन दोनच्या ज्योती देशमाने,ट्रेव्हर मार्टिस,पर्यावरण जिल्हाध्यक्षा सरोज शर्मा,प्रकाश चराटकर,आर्या वनौषधी संस्थेचे शशिकांत म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
                 दोन हजार पेक्षाही अधिक वनौषधी शिबिरे,शालेय विद्यार्थ्यांसाठी विशेष वनौषधी परिचय शिबिरे,चित्रकला स्पर्धा,निबंध स्पर्धा,विविध वनौषधी व्याख्याने,वनौषधी लागवड,संवर्धन,वनौषधी बी  वाटप,झाडांचे वाढदिवस या माध्यमातून सुधीर पाटील यांचे कार्य अखंड सुरु आहे.सुधीर पाटील जनते मध्ये पर्यावरण  संवर्धनाची ऊर्जा निर्माण करीत आहेत. गेल्या एक दशका पासून सुधीर पाटील यांचे हे कार्य सुरू आहे असे प्रतिपादन विंग कमांडर राजेंद्र महानुभाव यांनी सदर कार्यक्रमात बोलताना केले. स्थानिक वनौषधीचा एन्साक्लोपीडिया ही जनतेनी दिलेली पदवी खऱ्या अर्थाने सार्थक आहे असे गौरवोद्गार लायन्स क्लबचे सचिव महेश किनरे यांनी यावेळी काढले.
 
Comments