मोटारसायकलीसह रिक्षा चोरी करणारे तिघे गुन्हे शाखा कक्ष- ३च्या ताब्यात....
मोटारसायकलीसह रिक्षा चोरी करणाऱ्या तिघांना गुन्हे शाखा कक्ष- ३ च्या पथकाने घेतले ताब्यात....

पनवेल दि.06 (संजय कदम)- मोटारसायकलीसह रिक्षा चोरी करणाऱ्या तिघांना गुन्हे शाखा कक्ष-3 च्या पथकाने ताब्यात घेतले आहे. यांच्या अटकेने          नवी मुंबई आयुक्तालय हद्दीतील घडणा-या विविध गुन्ह्यांची ऊकल करण्याबाबत माननीय अप्पर पोलीस आयुक्त महेश धुर्ये गुन्हे, मा.पोलीस उप आयुक्त प्रविण पाटील गुन्हे यांच्या सुचना व आदेश असून सहायक पोलीस आयुक्त विनोद चव्हाण गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट कक्ष 3 शत्रुघ्न माळी वपोनि यांचे सुचनानुसार हद्दीमध्ये गुन्हे घडू नये याकरिता प्रतिबंधक गस्त सुरु असताना आज दि. 03/09/2021 रोजी तळोजा व खारघर परिसरामध्ये कक्षाकडील स.पो.नि खरोटे, स.पो.नि.पवार व अंमलदार नामे पोहवा/889 कोळी, पोना/2386 जोशी, पोना/2836 मोरे, पोना/2643 फुलकर यांना पापडीचा पाडा ते तळोजा जेल या रस्त्यावर तीन इसम संशयितरित्या विना नंबर प्लेटचे मोटार सायकलवरुन फिरताना दिसून आले. पोलीस पथकाने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करता ते पळून जावू लागल्याने पोलीस पथकाने त्यांना शिताफीने ताब्यात घेतले. सदर संशयीत नामे विधिसंघर्षग्रस्त 17 वर्षे 06 महिने रा. धानसरगाव, ता. पनवेल, जि. रायगड, आकाश हिरामण तोंडे वय 20 वर्षे, रा. रांजणपाडा, सेक्टर 27, राम मंदिराचे बाजूला, खारघर, नवी मुंबई मुळ रा. विठ्ठलनगर, टाटा पावर हाऊस, भिरा, ता. माणगाव, जि. रायगड, फरहान दाऊद शेख रा. ओवेकॅम्प, घर नं. 1096, खारघर, नवी मुंबई यांचेकडे कौशल्यपुर्ण तपास करता विधीसंघर्षग्रस्त बालक  याने त्याचे पालकांसमक्ष चालवित असलेली मोटार सायकल दिड वर्षापूर्वी खारघर येथून तर एक रिक्षा एन आर आय सागरी पोलीस ठाणे येथून चोरी केली असल्याबाबत गुन्ह्यांची कबुली दिली आहे. नमूद विधिसंघर्षग्रस्त बालक यांच्याकडून खालील नमुद गुन्हयातील सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संशयीतांकडे मिळून आलेल्या मोबाईलबाबत कोणतीही उपयुक्त माहिती तसेच कागदपत्रे संशयीतांनी सादर न केल्याने सदरचे मोबाईल संशयीतांकडून जप्त करण्यात आले आहेत. विधीसंघर्षग्रस्त बालकाकडून उघडकीस आलेले गुन्हे. खारघर पोलीस ठाणे गु.र.नं 391/2019 भादवि कलम 379 प्रमाणे.(मोटारसायकल), एन आर आय सागरी पोलीस ठाणे गु.र.नं. 210/2021 भादंवि कलम 379 प्रमाणे (ऑटो रिक्षा) वरील विधिसंघर्षग्रस्त बालक यांचे ताब्यातून एक बजाज कंपनीची सी टी 100 मोटार सायकल, एक काळया पिवळया रंगाची रिक्षा व संशयीतांकडील 2 मोबाईल असा एकूण किंमत 1,14,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. सदर विधिसंघर्षग्रस्त बालक व संशयीतांचा यांचा पूर्व इतिहास तपासला असता संशयितांवर वालिव पोलीस ठाणे गुरक्र 145/20 व अर्नाळा पोलीस ठाणे गुरक्र 47/2020 अन्वये गुन्हे दाखल असून विधिसंघर्षग्रस्त बालक याच्यावर ही नवी मुंबई व ठाणे परिसरात गुन्हे दाखल असून नमूद सर्वांचे वर्तन गुन्हेगारी स्वरुपाचे आहे. वपोनि शत्रुघ्न माळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक ह्यांनी गुन्हे शाखा कक्ष-3 चा गेले आठवड्यात चार्ज घेताच खारघर, एनआरआयचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.
Comments