ग्रुप ग्रामपंचायत पारगावतर्फे मोफत लसीकरणाला उत्स्फुर्त प्रतिसाद
पनवेल दि. ०६ (वार्ताहर)- राज्य शासनाच्या नवीन धोरणानुसार तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत पारगावच्या वतीने नुकताच मोफत लसीकरणाचा उपक्रम राबविण्यात आला होता. याला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे.
         यात 172 कोव्हिशिल्डचे डोस त्यात लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात आला. वय वर्ष 18 व 45 वरील व्यक्तींना डोस देण्यात आले. यावेळी सोशल डिस्टन्सिंग काटेकोरपणे पालन करण्यात आले. आधारकार्ड मार्फतच हे लसीकरण करण्यात आले. येथील सरपंच सौ. अहिल्या बाळाराम नाईक यांच्या प्रयत्नाने 172 डोस उपलब्ध करून देण्यात आले. तसेच वैद्यकीय अधिकारी गव्हाण कोपरच्या डॉ. अस्मिता पाटील यांच्या माध्यमातून उपसरपंच अंजली कांबळे, मा. उपसरपंच मनोज दळवी, मा. उपसरपंच सुशिल तारेकर, सदस्य विश्वनाथ पाटील, विजय वाघे, निशा पाटील, बानुबाई म्हात्रे, सोनाली भोईर, शिल्पा नाईक, कल्पना तारेकर, सुनंद भोईटे, डॉ. भारती, ग्रामविकास अधिकारी मोरेश्वर मोकल, मा. उपसरपंच रत्नदिप पाटील, राहूल कांबळे, कर्मचारी प्रमोद म्हात्रे, सोनिका, देवळे, श्रीमती चंद्रभागा तारेकर आदींनी विशेष सहभाग घेतला होता. या उपक्रमाबाबत विशेष कौतुक कऱण्यात आले आहे.       


Comments