१३ लाखांची वीज चोरी, गुन्हा दाखल....
पनवेल, दि. १२ (वार्ताहर) ः किरवली गाव येथे प्लास्टिक दाना बनवण्याच्या कारखान्यात तब्बल 13 लाखांची वीजचोरी पकडण्यात आली आहे याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किरवली टोल प्लाझा जवळ पनवेल मुंब्रा रोड येथे प्लास्टिक दाणा बनवण्याच्या कारखान्यात वीज चोरी होत असल्याची माहिती महावितरणला मिळाली होती. त्यानुसार महावितरणच्या अधिकार्यांनी या ठिकाणी पाहणी केली. अनधिकृतपणे मीटरमध्ये फेरफार करून वीज पुरवठा वापरून तो स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वापरला व महावितरणचे गेल्या सहा महिन्यांपासून 65 हजार 703 युनिटचे नुकसान केले व 12 लाख 96 हजार 70 रुपयांची वीज चोरी करून महावितरणचे आर्थिक नुकसान केले.